घरताज्या घडामोडी१२वीच्या इंग्रजी पेपरच्या प्रश्नपत्रिकेत मोठा गोंधळ; प्रश्नाऐवजी दिली उत्तरं

१२वीच्या इंग्रजी पेपरच्या प्रश्नपत्रिकेत मोठा गोंधळ; प्रश्नाऐवजी दिली उत्तरं

Subscribe

एकीकडे परीक्षे दरम्यान कॉपी करू नये असे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेतच मोठा घोळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १२वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी १२ वीची लेखी परीक्षा मंगळवार २१ फेब्रुवारी ते मंगळवार, दिनांक २१ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. एकीकडे परीक्षे दरम्यान कॉपी करू नये असे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेतच मोठा घोळ झाल्याची माहिती समोर आली आहे. (Exam 12th English Paper Board Wrong Student In Marathwada)

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा आज इंग्रजी विषयाचा पेपर होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले. तसेच, या चुकांबाबत इंग्रजी विषयाच्या शिक्षकांमध्ये पेपर संपल्यानंतर चर्चा रंगली आहे. या चर्चेनुसार, इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक A3, A4, आणि A5 या क्रंमाकांचे प्रश्न न विचारता थेट उत्तरं देण्यात आली आहेत.

- Advertisement -

प्रश्न कमांक तीनमध्ये A3 व A5 या क्रमाकांचे प्रश्न न विचारता परिक्षकाला ज्या सुचना नमुना उत्तरपत्रिकेत दिलेल्या असतात. त्या सुचना कृतिपत्रिकेत दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, A4 चा प्रश्न अलंकार ओळखा आणि दिलेली ओळ लेखन नियमानुसार लिहा असे न विचारता थेट उत्तर कृतिपत्रिकेत दिलेले आहे.

दरम्यान, यंदाची १२वीची परिक्षा कडक करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने भुमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात पर्यवेक्षकांची अदला बदल करण्यात आली आहे. मात्र या परीक्षेसाठी दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना या गोधळाचा मोठा फटका बसला आहे. तसेच, आता विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे गुण मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील टिळक नगरमध्ये यूपीच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालकाची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -