घरमहाराष्ट्रमुलीचा हात पकडून प्रपोज करणं छेड काढल्याचं ठरत नाही, हायकोर्टाचा रिक्षाचालकाला दिलासा

मुलीचा हात पकडून प्रपोज करणं छेड काढल्याचं ठरत नाही, हायकोर्टाचा रिक्षाचालकाला दिलासा

Subscribe

Mumbai High Court News | न्यायाधीश भारती डांगरे म्हणाल्या की, पीडितेने दिलेल्या जबाबानुसार आरोपीला पीडितेचा विनयभंग किंवा तिची छेडछाड काढायची नव्हती. त्यामुळे हायकोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Mumbai High Court News | मुंबई – मुलीचा हात पकडून तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवणं (Propose) छेड काढल्यासारखं (Teasing) ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या (Nagpur Bench of Mumbai High court) न्यायाधीश भारती डांगरे यांच्या एकलपीठाने दिला आहे. यामुळे रिक्षाचालकाला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायाधीश भारती डांगरे म्हणाल्या की, पीडितेने दिलेल्या जबाबानुसार आरोपीला पीडितेचा विनयभंग किंवा तिची छेडछाड काढायची नव्हती. त्यामुळे हायकोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा – म्हाडा, महापालिकेला हायकोर्टाचा दणका; विकासकाला परत मिळणार पाच कोटी

- Advertisement -

१ नोव्हेंबर २०२२ रोजी एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात एका रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार १७ वर्षीय मुलीची धनराज बाबू सिंह राठोड याने छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक धनराज बाबू सिंह राठोड याच्याविरोधात पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला.

१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कॉलेज आणि ट्युशनला जाताना धनराजच्या रिक्षातून जात असे. परंतु, तिने त्याच्या रिक्षातून जाण्यास बंद केल्यामुळे धनराज तिचा पाठलाग करत होता. रिक्षाचालकाने १ नोव्हेंबर २०२२ मध्ये त्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून त्याने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. तसंच, बाईकवरून तुला घरी सोडतो असंही म्हणाला. मात्र, मुलीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत थेट घर गाठलं. घरी गेल्यावर तिने तिच्या वडिलांसमोर संपूर्ण आपबिती कथन केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हेही वाचा – व्यक्तीने सतत गैरवर्तन सहन करावे, अशी अपेक्षा करता येणार नाही, दिल्ली हायकोर्टाचे मत

सुनावणीदरम्यान कोर्टाने सांगितले की, अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न झाला असं तरी प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. कारण आरोपीने छेड काढण्याच्या उद्देशाने पीडितेचा हात पकडला नव्हता. त्यामुळे आरोपी अटकपूर्व जामिनास पात्र आहे. कोर्टाने आरोपीला जामीन देतानाच तंबीही दिली की, तो यापुढे पुन्हा असं करणार नाही. नाहीतर पुढच्या वेळेस त्याला अशी सवलत मिळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -