घरअर्थजगत'त्या' लिंकवर क्लिक करणं पडलं महागात, मुंबईत ४० लोकांना लाखोंचा गंडा

‘त्या’ लिंकवर क्लिक करणं पडलं महागात, मुंबईत ४० लोकांना लाखोंचा गंडा

Subscribe

कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे, ओटीपी आणि पासवर्ड शेअर न करण्याचे सातत्याने आवाहन केले जात असले तरीही अनेकजण अशा गोष्टींना बळी पडत आहेत. असाच प्रकार मुंबईत घडला असून तब्बल ४० जणांना लाखो रुपयांचा गंडा बसला आहे. धक्कादायक म्हणजे हे सर्व ४० जण एका खासगी बँकेचे खातेदार आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून बँक ग्राहकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबईची जलवाहिनी ठाण्यात फुटली; लाखो लिटर पाणी वाया, ‘या’ भागांमध्ये पाणी कपात

- Advertisement -

मुंबईतील एका खासगी बँकेतील ४० ग्राहकांच्या मोबाईलवर एक बनावट मेसेज आला होता. केवायसी आणि पॅन कार्डची माहिती अपडेट करण्याकरता दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याची सूचना देण्यात आली होती. हा मेसेज बँकेतूनच आला असावा असा समज करत ४० जणांनी या लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक केल्यानंतर एक वेबसाईट ओपन झाली. त्यावर बँकेचा आयडी, पासवर्ड टाकण्यास सांगितले. तसंच, ओटीपीही मागितला. बँकेच्या एका बनावट कर्माचाऱ्याने ग्राहकांकडून ओटीपी घेत त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आले. ४० जणांच्या खात्यातून तब्बल लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

फसवणूक झालेल्या ४० जणांमध्ये टीव्ही अभिनेत्री श्वेता मेमनचाही समावेश आहे. तिने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे तिच्या खात्यातून ५७ हजार ६३६ रुपये काढून घेण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून आवाहन
सायबर चोरांकडून ऑनलाईन फसवणूक वाढली आहे. त्यामुळे नेट बँकींग, मोबाईल बँकींग करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही लिंकवर खात्री न करता लिंक करणे धोक्याचे ठरेल. तसंच, कोणालाही आपल्या बँकेचा आयडी, पासवर्ड आणि ओटीपी शेअर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हेगार फिशिंग लिंक पाठवून ग्राहकांना जाळ्यात ओढतात. त्यामुळे ग्राहकांना काहीही कळायच्या आतच त्यांच्या खात्यातून पैसे वजा झालेले असतात. त्यामुळे असे प्रकार रोखायचे असतील तर सतर्कतेने व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -