घरमहाराष्ट्रतुम्ही म्हणाल त्या मंदिरात देवावर हात ठेवून सांगावं..., निलेश राणेंकडून वैभव नाईकांना थेट आव्हान

तुम्ही म्हणाल त्या मंदिरात देवावर हात ठेवून सांगावं…, निलेश राणेंकडून वैभव नाईकांना थेट आव्हान

Subscribe

मुंबई – भाजपा आणि ठाकरे गटात कोकणात जुंपली आहे. मी ठाकरेंचा सच्चा निष्ठावान सैनिक असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं होतं. मात्र, भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी एक व्हिडीओ प्रसारित वैभव नाईकांच्या दाव्याची हवाच काढून टाकली आहे. एवढंच नव्हे तर देवावर हात ठेवून वैभव नाईकांनी हे कबुल करावं, असं थेट आव्हानही निलेश राणेंनी दिलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाने मोठे फेरबदल केले आहेत. या बदलात वैभव नाईक यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. तर, संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नाराज झालेले वैभव नाईक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. परंतु, मी उद्धव ठाकरेंचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचं वैभव नाईकांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे-फडणवीस यांच्यात नवी युती? राऊत म्हणतात, विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच…,

मी नव्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले आहेत. मी उद्धव ठाकरे यांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी ठाकरे गटाला सोडून कुठेही जाणार नाही, असं वैभव नाईक म्हणाले होते. परंतु, निलेश राणेंनी वैभव नाईकांचा हा दावा फेटाळून लावला आहे. वैभव नाईक अनेकदा एकनाथ शिंदेंना भेटले आहेत, त्यांनी अनेक कामं करून घेतली आहे, असं निलेश राणे म्हणाले.

- Advertisement -

आज एक व्हिडीओ प्रसारित करून निलेश राणेंनी वैभव नाईकांवर टीकेचे बाण सोडले. “वैभव नाईकांनी निष्ठेच्या गोष्टी करू नयेत. मी उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडणार नाही, असं म्हणणारे वैभव नाईक कितीतरी वेळा एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. शिंदेंकडून किती कामे करून घेतली, काय काय बोलला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वैभव नाईकांनी निष्ठेच्या वार्ता करू नयेत. वैभव नाईक ज्या मंदिरात सांगेल, जिथे बोलवेल त्या देवावर हात ठेवून नाईकांनी सांगांवं की असं बोलले की नाही,” असं निलेश राणे म्हणाले.

तसंच, “उद्धव ठाकरे तेल लावत गेले. पण मी आमदार राहिलो पाहिजे असं वैभव नाईकांचं गणित आहे. वैभव नाईक हा शिवसेनेत का आहे कारण आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ते उद्धव ठाकरेंना खोटं बोलत आहे. सर्व जिल्ह्यातील मलाई यांनी खालली,” असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -