घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंची आजची मालेगावमधील सभा का आहे महत्वाची? वाचा..

उद्धव ठाकरेंची आजची मालेगावमधील सभा का आहे महत्वाची? वाचा..

Subscribe

खेडनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी (ता. २६ मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार असून ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात सभा घेणार आहेत. ज्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. या सभेमधून उद्धव ठाकरे हे पुन्हा राज्यातील जनतेला संदेश देण्यार असल्याचे बोलले जात आहे. मालेगाव हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने महत्वाची असणार आहे. कारण उत्तर महाराष्ट्रात असलेल्या नांदगाव, जळगाव धुळे येथे ठाकरे गटाचे कोणतेही प्रभावी नेतृत्व अद्याप तरी नाही. ज्यामुळे या भागात नेतृत्व तयार करण्यासाठी आणि मतदारसंघाच्या बांधनीसाठी आजची सभा घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

मराठवाडा, मुंबई आणि कोकण पाहता ठाकरे गटाची उत्तर महाराष्ट्रात अत्यंत कमकुवत बाजू पाहायला मिळते. ज्यामुळे २०२४ चा विचार केला असता ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्रातील जागांसाठी तयारी करणे आत्तापासूनच गरजेचे आहे. तर आजच्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नेमके कोणावर निशाणा साधतात की, मालेगावमध्ये न होणाऱ्या विकासाबद्दल बोलतात हे पाहणे, महत्वाचे ठरणार आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने उद्धव ठाकरे या सभेच्या माध्यमातून या निर्णयाबाबत काय मत व्यक्त करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

मालेगावमध्ये गेल्या काही वर्षात फारसा विकास झालेला नाही. येथील यंत्रमाग आणि हातमाग कामगारांचे प्रश्न आजही प्रलंबित आहे. तर या शहरात वाढती अतिक्रमणे आणि सगळ्यत महत्त्वाचे म्हणजे येथील मुस्लिम समाज याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून नेमके काय बोलण्यात येते, हे आज कळणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत हे तळ ठोकून आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी या शहरातील भाजपचे नेतृत्व असलेले अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करून भाजपला आणि सोबतच शिवसेनेला (शिंदे गट) खूप मोठा धक्का दिला होता. ज्यामुळे ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांच्यामुळे थोडेफार का असेना पण समर्थक वाढू लागले आहेत. तर अद्वय हिरे हेच या भागातून पुढील आमदार असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच आजची सभा ही खेडमधील सभेसारखीच विराट आणि ऐतिहासिक होणार असल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेही म्हणणार “लाव रे तो व्हिडीओ”
हल्ली सभांमध्ये एलईडी स्क्रीन लावणे आणि त्यावर व्हिडीओ लावणे हा फंडा सगळेच आजमावू लागले आहेत. नुकत्याच गुडीपाडव्याच्या दिवशी झालेल्या मनसेच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी सुद्धा एलईडी स्क्रीनवरून उपस्थित लोकांना एक चित्रफीत लावली होती. खरं तर “लाव रे तो व्हिडीओ” ही संकल्पना खरी मनसेची असली तरी याचा अवलंब सर्वच पक्षांकडून होऊ लागला आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये सुद्धा एलईडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे आणि म्हणूनच या एलईडी स्क्रीनवरती नेमके काय दाखवण्यात .येणार आहे, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंची आज मालेगावमध्ये जाहीर सभा; शहरात उर्दू भाषेत लावण्यात आले बॅनर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -