घरमहाराष्ट्रसावरकरांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत काँग्रेस अन् राहुल...

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत काँग्रेस अन् राहुल गांधींना सुनावले

Subscribe

मालेगावः सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे जाहिर आवाहन उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली. आम्ही तुमच्या सोबत होतो. तुमच्या सोबत राहणार आहोत. पण तुम्ही सावरकरांचा अपमान करु नका. सावरकर यांनी १४ वर्षे छळ सोसला आहे. त्यांचा अपमान करु नका. आपण लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत. संविधान टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे सावरकरांवर टीका करु नका. हे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आता संधी चुकली आणि २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा ते सत्तेत आले तर या देशातील लोकशाही संपेल हे लक्षात ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत सांगितले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही स्वतःला सावरकर प्रेमी म्हणता मग हा देश वाचवण्यासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजे. सावरकर हे बघत असतील तर त्यांनाही प्रश्न पडला असले की मी याच्यासाठी स्वातंत्र्य दिलं का. सावरकरांमुळे मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.  असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत भाजपला केले.

ज्यांचा स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. ते आज आपल्याला स्वातंत्र्याबद्दल सांगत आहेत. त्यामुळे काहीजण खोटी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतील. तुम्हाला खोटी आश्वासने देतील. त्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आम्ही छातीवर दगड ठेवून यांना मुख्यमंत्री केलं. भाजपवाले म्हणतात आमच्याकडे गुजरातहून वॉशिंग पावडर येते. त्यामुळेच आम्ही सर्वांना धुवुन स्वच्छ करतो. आता मला कळाले हे सर्व गुजरातला का गेले होते ते. गद्दारीचा शिक्का तुमच्या कपाळावर आहे. जेथे मत मागायला जाल त्यावेळी हे विसरु नका. तुम्ही गद्दारी करुन मुख्यमंत्री झाला आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

१५ दिवसांपूर्वी संजय कदम, अद्वय आले हे सभा सभारंभ पुरता असू नये. ही लढाई देशाची, शेतकऱ्यांची आहे. तुमची मला आवश्यकता आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलला तसा लोकांनी पण हातभार लावला तसा तुम्ही पण हातभार लावा. रावण धनुष्य घेतांना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण? मी तुमच्या सोबतीने लढायला उभा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

– कोणाच्या पत्नीवर बोलता तेव्हा त्या महिलेचा अपमान होत नाही, का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना केला आहे.
– तुमचा नेता म्हणजे भारत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघात केला.
– देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी रक्त सांडलं ते काय यांच्यासाठी सांडलं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
– राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदूत्व आहे.
– 2024 मध्ये भाजप पुन्हा निवडून आली तर यापुढे निवडणुका होणार नाही. हे अंधभक्तांनीही लक्षात घेतलं पाहिजे.
– ही लढाई काही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही, तर लोकशाही वाचवण्यासाठी आहे. देशाचं संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -