घरमहाराष्ट्रपुणेबापट गेले... पण त्यांचे शनिवारी पेठेतील कार्यालय २४ तासांच्या आत झाले सुरू

बापट गेले… पण त्यांचे शनिवारी पेठेतील कार्यालय २४ तासांच्या आत झाले सुरू

Subscribe

बुधवारी (ता. २९ मार्च) पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाले. पण त्यांच्या निधनाच्या २४ तासांच्या आतचं त्यांचे पुण्यातील शनिवार पेठेतील कार्यालय सुरु करण्यात आले आहे.

पुण्याच्या विकासासाठी आणि पुण्यातील जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे काल बुधवारी (ता. २९ मार्च) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पण बापटांच्या निधनानंतर देखील त्यांचे शहरातील शनिवार पेठ येथील कार्यालय हे २४ तासांच्या आत पुन्हा सुरु करण्यात आले. गिरीश बापट हे रुग्णालयात दाखल असताना देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचे कोणतेही काम अडून राहू नये, यासाठी हे कार्यालय अविरतपणे सुरू ठेवण्यात आले होते.

आज (ता. ३० मार्च) सकाळी नेहमीप्रमाणे साडेआठ वाजता गिरीश बापट यांचे कार्यालय त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुर करण्यात आले. त्यानंतर बापट हे ज्या ठिकाणी बसायचे, त्याठिकाणी असलेल्या खुर्चीवर त्यांचा फोटो ठेऊन संपर्क कार्यालयातील कामकाजाला सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील एक अजातशत्रू नेता आणि लोकनेता म्हणून गिरीश बापट यांच्याकडे पाहिले जायचे. कारण कोणत्याही नागरिकाचे कोणतेही काम असो, बापट हे कोणतेही कारण न देता ते काम पुर्ण करायचे.

- Advertisement -

गिरीश बापट यांनी अनेक वर्ष या कार्यालयात बसूनच जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांचे प्रश्न जाणून घेतले आणि ते प्रश्न जागच्या जागी बसून सोडवले सुद्धा. त्यांच्या या शनिवार पेठेतील कार्यालयात येणारी एकही व्यक्ती रिकाम्या हाताने गेली, असे कधीही झाले नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे गिरीश बापट हे खासदार झाल्यानंतर ते दिल्लीत असल्यावर देखील त्यांचे हे कार्यालय कायम सुरु ठेवण्यात येत होते. बापट नसले तरी त्यांच्या या कार्यालयात बसणारा स्टाफ समस्या घेऊन येणाऱ्या लोकांचे ऐकून त्या समस्या सोडवण्याचे काम करायचे. अगदीच कोणती मोठी समस्या असेल तर ती समस्या बापट यांना सांगून ते सांगतील त्याप्रमाणे त्या समस्येवर मार्ग काढला जात असे.

गेल्या अनेक महिन्यांपासून गिरीश बापट हे कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात उपचार सुरु होते. पण बुधवारी (ता. २९ मार्च) सकाळी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. काल सायंकाळी ०७ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा : नाना पटोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -