घरमहाराष्ट्रमेट्रो -३ मार्ग यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार; मुख्यमंत्री शिंदे यांच्यांकडून प्रकल्पाची पाहणी

मेट्रो -३ मार्ग यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार; मुख्यमंत्री शिंदे यांच्यांकडून प्रकल्पाची पाहणी

Subscribe

मुंबई : कुलाबा – वांद्रे – सीप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग सध्या जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून तो येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुंबई मेट्रो -३ (Metro – 3) प्रकल्पाच्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाची त्यांनी चालत पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग – ३ (कुलाबा – वांद्रे – सीप्झ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

- Advertisement -

मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २, ६ आणि ९ यांना तसेच मोनो रेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तसेच मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे.

या मेट्रो -३ रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे; तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील. या मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

राज्याच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत, त्यांना विलंब होणार नाही. आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी- कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पाविषयी –

  • या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवर आहे.
  • या मार्गामुळे प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, मनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरी रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवी, गिरगाव, वरळी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांसारख्या भागांना जोडणी मिळेल.
  • २०२४ पर्यंत मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील.
  • इतर मेट्रो मार्ग, मोनोरेल, उपनगरी रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरी रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो -३कडे वळतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -