घरदेश-विदेशItaly explosion : स्फोटाने मिलान शहर हादरले, कारमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज

Italy explosion : स्फोटाने मिलान शहर हादरले, कारमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज

Subscribe

मिलान : उत्तर इटलीतील मिलान शहरात एक मोठा स्फोट (Italy explosion) झाल्याचे वृत्त आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाला. यानंतर अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिक न्यूज चॅनल स्कायटीजी 24ने (SkyTG24) मिलानमधील पोर्टा रोमाना (Porta Romana) येथील व्हिडीओ फुटेज जारी केले. या फुटेजमध्ये वाहने जळताना आणि काळा धूर निघताना दिसत आहे. आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

मिलान (Milan) हे रोम नंतर इटलीचे दुसरे मोठे शहर आहे. स्थानिक वृत्तवाहिनीच्या दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला छोटा स्फोट झाला, पण नंतर मोठे स्फोट झाले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आग लागली. या आगीत किमान 5 कार आणि 2 इतर वाहने भस्मसात झाली आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळावरून लोकांना बाहेर काढले. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांमधून ज्वाळा आणि धूर निघताना दिसत आहे. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा परिसर सील करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या स्फोटात नेमके कोणते नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे.

हेही वाचा – विरोधकांकडून चेहरा शरद पवारांचा होऊ शकतो, नितीश कुमारांनी सांगताच, पवार म्हणाले…

- Advertisement -

तत्पूर्वी, गुरुवारी दुपारी जर्मनीतील रेटिंगेन शहरातील एका निवासी इमारतीत स्फोट झाला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल: नबाम रेबिया प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -