घरमहाराष्ट्र‘चोर आणि लफंगे’ हीच भाजपाच्या सत्तेची गुरुकिल्ली, ठाकरे गटाचा घणाघात

‘चोर आणि लफंगे’ हीच भाजपाच्या सत्तेची गुरुकिल्ली, ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra political crisis) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निकालावरून भारतीय जनता पक्षाने (BJP) काय लायकीची माणसे राज्यपालपदी नेमली होती ते दिसले. महाराष्ट्रात सत्ताबदल होताच अशा गुन्हेगारी वृत्तीच्या राज्यपालांवर देशद्रोहाचा खटलाच चालवायला हवा. घटनेचे संरक्षण करण्याचे काम ज्या व्यक्तीवर सोपवले होते, तोच चोर निघाला. असे ‘चोर आणि लफंगे’ हीच भाजपच्या सत्तेची गुरुकिल्ली आहे. तेच त्यांचे बळ आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

विचार, राष्ट्रभक्ती, नैतिकता वगैरे सगळे त्यांच्या दृष्टीने झूठ आहे, तर सरकारला बेकायदेशीर ठरवूनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हसत आहेत. हाच निर्लज्जपणा महाराष्ट्राच्या व देशाच्या मुळावर येत आहे. आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार न्याय मंडळास नाही, पण आमदारांनी बेकायदेशीर कृत्य केलेच आहे. बनावट व्हीप निर्माण केला. शिंदे गटाचा व्हीपच न्यायालयाने खोटा ठरविला. त्या खोट्या ‘व्हीप’चे आदेश पाळून आमदारांनी पक्षद्रोह केला हे न्यायालयाने सिद्ध केले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारचा कोडगेपणा
श्रद्धा आणि सबुरी हा शिर्डीच्या साईबाबांनी अखिल मानवजातीस दिलेला मोलाचा मंत्र आहे. महाराष्ट्रासह देशात सध्या ज्या घडामोडी घडवल्या जात आहेत त्यातून श्रद्धा व सबुरीचे उच्चाटन झाले आहे काय, असा प्रश्न पडतो. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य ठरवले. हा संविधान पीठाचा निकाल आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) विजयी हास्याने पत्रकारांसमोर आले व म्हणाले, ‘‘आम्हीच जिंकलो आहोत. निकाल आमच्या बाजूनेच लागला. लोकशाहीचा विजय झाला,’’ असे हसत हसत सांगणे याला मराठीत कोडगेपणा म्हणतात, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या मंडळींना इतके उघडे-नागडे केले आहे की, त्यांच्या कमरेवर अंतर्वस्त्रही ठेवले नाही. अशा उघड्या अवस्थेत सिंहासनावर बसून हे निर्लज्ज मंडळ ‘व्ही फॉर व्हिक्टरी’च्या खुणा करून आनंद उत्सव साजरा करत आहे. नैतिकता तर त्यांनी ठाण्याच्या मासुंदा तलावात बुडवलीच, पण उरलीसुरली लाजही नागपूरच्या अंबाझरी तलावाकाठी उघडी होऊन नाचताना दिसत आहे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी घटनाबाह्य कृत्य का करावे?
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन करताना सर्वकाही चुकीचे केले, घटनाबाह्य केले, असे सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही या मंडळींना असा कोणता विकृत आनंद झाला? सर्व बेकायदेशीर असूनही सरकार वाचले याचा? की न्यायालयाने त्यांच्या निर्लज्जपणावर शिक्कामोर्तब केले याचा? जर राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी शिंदे-फडणवीस खोका कंपनीस बोलावणे हे बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालय सांगतेय तर त्या बेकायदेशीर बहुमत चाचणीला सामोरे जाऊन उद्धव ठाकरे यांनी घटनाबाह्य कृत्य का करावे? असे सवाल ठाकरे गटाने केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -