घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात भाजप पायउतार? ३८ वर्षांची परंपरा कायम;...

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात भाजप पायउतार? ३८ वर्षांची परंपरा कायम; काँग्रेसला स्पष्ट बहुमत

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने ३८ वर्षांची परंपरा कायम राखत सत्तापालट केला आहे. भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचारी सरकारचा काँग्रेसने केलेला आरोप जनतेने निकालातून खरा ठरवलेला दिसत आहे. कोणतीही आघाडी किंवा घोडेबाजाराची संधीही जनतेने ठेवलेली नाही. काँग्रेसला पूर्ण बहुमतासह १२१ तर भाजपला ७२ जागांवर जनतेने रोखले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला खातेही उघडता आलेले नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सत्तेतून पायउतार होताना दिसत आहे. सकाळी ११ वाजतापर्यंत आलेला निकालाचा कौल आणि आघाडीनुसार काँग्रेसला ११८ जागांवर आघाडीवर दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष पिछाडीवर गेला असून त्यांना ७० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहे. गेल्या ३८ वर्षांची परंपरा कन्नडिगांनी कायम ठेवल्याचे चित्र आज सकाळपासूनच पाहायला मिळत आहे.
जनता दल (सेक्यूलर) किंग मेकरच्या भूमिकेत पुढे येईल ही शक्यताही आता मावळली आहे, असा स्पष्ट कौल कर्नाटकच्या जनतेने दिला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झालं. आज (शनिवार) सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या तीन तासांतच कर्नाटक विधानसभेवर काँग्रेसचा एकहाती झेंडा फडकताना दिसत आहे. काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता आहे.

- Advertisement -

आज सकाळपासून येणारे कल पाहिले तर कर्नाटकने ३८ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. १९८५ पासुन आतापर्यंत कर्नाटकात कोणताही एक पक्ष सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करु शकलेला नाही. यंदाचे निकालही या परंपरेला साजेसे आहेत. भारतीय जनता पक्ष पायउतार होताना दिसत आहे.

कर्नाटकने काँग्रेसला एकहाती सत्ता स्थापन करण्याचा स्पष्ट जनादेश देताना दिसत आहे. बंगळुरु ग्रामीणमध्ये सर्वाधिक ८४ टक्के मतदान झाले होते. तर बीबीएमपी उत्तर भागात सर्वात कमी ५६ टक्के मतदान झाले. काँग्रेसकडून या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वाधिक गाजला. भाजप नेते आणि मंत्र्यांकडून ४०टक्के टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप राहुल गांधींकडून वारंवार करण्यात आला. निवडणुकीतही हा मुद्दा महत्त्वाचा ठरल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ४० टक्के मतदारांनी भ्रष्टाचार, १९ टक्के मतदारांनी विकासासाठी मतदान केले तर २६ टक्के मतदारांनी उम्मेदवार आणि पक्ष पाहून मतदान केल्याचे सांगितले.
२०१८ मधील आकडे पाहिले तर मतदानाच्या टक्केवारीत काँग्रेसला सर्वाधिक मते (३८.१४%) मिळाली मात्र जागा (८०) त्यांना भाजप पेक्षा कमी मिळाल्या होत्या. तर भाजपची मतदानाची टक्केवारी ३६.३५% असूनही त्यांना १०४ जागा मिळाल्या होत्या. त्याचे कारण २२४ पैकी निम्म्या अर्थात १२२ जागांवर विजयाचे मार्जिन हे १० टक्क्यांपेक्षाही कमी होते. तर ६१ जागांवर ५ टक्क्यांपेक्षाही कमी मतांनी भाजपला विजय मिळाला होता.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा २०१८
भारतीय जनता पक्ष – १०४
काँग्रेस – ७८
जनता दल (एस) – ३७

२०१८ मध्ये भाजपने येदियुरप्पा यांचा चेहरा समोर करुन निवडणूक लढवली होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र नंतर मोदी-शहांनी भाकरी फिरवली आणि २०२१ मध्ये बसवराज बोम्मई यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.
दर पाच वर्षांनी कर्नाटकची जनता काँग्रेस आणि भाजप यांना आलटून-पालटून सत्तेची चावी देत आली आहे. मोदी लाटेपूर्वी २०१३ मध्ये कन्नडिगांनी काँग्रेसला १२२ जागांसह स्पष्ट बहुमत दिले होते. तेव्हा काँग्रेसने लिंगायत समाजाचे मोठे नेते सिद्धरामैय्या यांना मुख्यमंत्रीपद दिले.

कर्नाटक विधानसभा २०१३
काँग्रेस – १२२
भारतीय जनता पक्ष – ४०
जनता दल (एस) – ४०
मुख्यमंत्री – सिद्धरमैय्या, काँग्रेस

गेल्या ३८ वर्षांची परंपरा कर्नाटकने यंदाही कायम राखत भाजपला धडा शिकवत काँग्रेसला संधी दिली आहे. काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. त्यासोबत काँग्रेसची मतदानाची टक्केवारी २०१९ पेक्षा वाढली आहे. तब्बल १० टक्के मतदान वाढले आहे. देवेगौडांचा जेडी (एस) किंगमेकर ठरण्याची शक्यता अनेक एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली होती. मात्र त्यांना २४ पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत नाहीत. यामुळे घोunडेबाजारालाही संधी मिळताना दिसत नाही.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -