घरमहाराष्ट्रमिस् कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती, सर्वसामान्यांसाठी पुढाकार

मिस् कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती, सर्वसामान्यांसाठी पुढाकार

Subscribe

मुंबई : विविध शस्त्रक्रिया, दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Minister’s relief fund) मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, असे अनेक प्रश्न गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पडतात. विशेषत: ग्रामीण भागातील जनतेला हा अर्ज करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला असून आता फक्त एका मिसकॉलवर (Missed Call) हा निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होईल.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून विविध आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आतापर्यंत ६० कोटीपेक्षा अधिक मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होत असतात. यासाठी आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज दाखल केल्यानंतर आठ दिवसात वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. मात्र हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षापर्यंत पोहोचणे ग्रामीण भागातील जनतेला शक्य होत नाही. अशा जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -

या सुविधेनुसार मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाईलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट आऊट काढून तो भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल.

२५ टक्के अर्ज कर्करोगावरील उपचारांसाठी
मुख्यमंत्री सहायता निधीचे सर्वाधिक येणारे अर्ज हे कर्करोगासाठी येत आहेत. हे प्रमाण एकूण अर्जांच्या २५ टक्के आहे. त्यापाठोपाठ हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, डायलीसीसी, किडनी विकार या आजारांसाठी मदतीचे अर्ज येत असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शुक्रवारी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -