घरमहाराष्ट्रED inquiry : टिल्लूपासून उल्लूपर्यंत सर्वांची वरात निघेल... राष्ट्रवादीची भाजपावर टीका

ED inquiry : टिल्लूपासून उल्लूपर्यंत सर्वांची वरात निघेल… राष्ट्रवादीची भाजपावर टीका

Subscribe

मुंबई : आयएल अँड एफएस कंपनीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. त्यांना आजही, सोमवारी चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress Party) तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. टिल्लूपासून उल्लूपर्यंत सर्वांची वरात निघेल, असा गर्भित इशाराच राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते एका पाठोपाठ एक असे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात येत आहेत. आतापर्यंत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची व माजी मंत्र्यांची ईडीकडून चौकशी (ED inquiry) झाली आहे. यापैकी नवाब मलिक हे कारागृहात आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.

- Advertisement -

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी कार्यालयात नुकतेच दाखल झाले आहेत. हे पाहून भाजपा व शिंदे गटातील जे नेते आसुरी आनंद घेत असतील, त्यांच्या चौकशीचा प्रत्यक्ष क्षण लवकरच येईल, टिल्लूपासून उल्लूपर्यंत सर्वांची वरात निघेल, असे त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. याला यादी तयार असा हॅश टॅग देण्यात आला आहे.

- Advertisement -

या ट्वीटच्या आधी आमदार मिटकरी यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. फक्त राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट करणाऱ्या भाजपाने आपले सरण स्वतःच रचले आहे, हे मात्र नक्की. जसे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात यांचे तोंड पोळलं आहे, तसंच याही प्रकरणात ते उघडे पडतील, असा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -