घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत, नितेश राणेंची खोचक टीका

महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत, नितेश राणेंची खोचक टीका

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेमके कोणाचे आहेत, हे त्यांनाच माहिती नसल्यामुळे सरड्याला पण लाज वाटेल इतक्या वेळा ते रंग बदलतात. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहे, असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत. गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन अनेकांचं मनोरंजन करते. ती स्वत:ही नाचते आणि लोकांनाही नाचवते. त्यामुळे ती उत्तम कलाकार आहे. तिला जसं रोज बघायला लोकांना आवडतं, तसंच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला दररोज सकाळी येऊन वाटतं की, मी लोकांचं मनोरंजन करतो. तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे, असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊतांकडं गौतमी पाटीलनं मेकअपचं सामान पाठवावं, अशी तिला मी विनंती करतो. संजय राऊत हे रोज सकाळी येऊन लोकांची सकाळ खराब करतात. तसेच कोणाच्या तरी तालावर, सुपारी घेऊन आणि दलाली करून नुसतं आग आणि काड्या लावण्याचं काम करतात. त्यामुळे हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे, असंही म्हणते राणेंनी राऊतांवर निशाणा साधला.

राऊतांचं आज सकाळी गजानन कीर्तिकर यांच्यावर फार प्रेम ओतू येत होतं. जेव्हा तुमच्याकडे आमदार-खासदार होते. तेव्हा तुमचे मालक(उद्धव ठाकरे ) या आमदार-खासदारांचं किती वेळा अपमान करत होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तासन् तास गजानन कीर्तिकर, दिवाकर राऊते यांसारखे अनेक नेते वर्षावर बसून राहायचे. परंतु उद्धव ठाकरे त्यांना वेळही द्यायचे नाही.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या आमदार-खासदारांचा अपमान झाल्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि मविआमध्ये मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे त्या अडीच वर्षात अजित पवारांनी त्यावेळच्या ठाकरेंच्या आमदारांना पवारांनी किती निधी दिला?, अजित पवार हे सर्वात कमी निधी हे शिवसेनेच्या आमदारांना द्यायचे, असं म्हणत राणेंनी अजित पवारांवर टीका केली.

भाजपासोबत युती असताना शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि ठाकरेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप मान-सन्मान द्यायचे. जेवढे त्यांचे भाऊ देणार नाहीत, तेवढा मान हे फडणवीस ठाकरे कुटुंबियांना द्यायचे. म्हणून तर ठाकरे ट्रस्टवर स्मारक बनतंय. या सर्व परवानग्या फडणवीसांनीच मिळवून दिल्या, असंही राणे म्हणाले.


हेही वाचा : माझी आतल्या गोटातली माहिती…, निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -