घरठाणेप्रशांत कॉर्नरवर केलेल्या कारवाईनंतर आव्हाडांनी केला पालिकेच्या कृत्याचा निषेध

प्रशांत कॉर्नरवर केलेल्या कारवाईनंतर आव्हाडांनी केला पालिकेच्या कृत्याचा निषेध

Subscribe

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर ठाणे महापालिकेने कारवाई करून बाहेरील अनधिकृत बांधकाम तोडले आहे. या कारवाईमागे एका बड्या नेत्याच्या पत्नीचा अहंकार दुखावल्यामुळे पालिकेने ही कारवाई केल्याची जोरदार चर्चा सध्या ठाणे शहरात सुरू आहे. मात्र, यावर पालिकेचा कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रशांत कॉर्नरवर केलेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेच्या कृत्याचा निषेध केला आहे.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ठाणे महापालिकेच्या या कृत्याचा निषेध केला आहे. काल ठाणे महानगरपालिकेने उत्सफुर्तपणे दुकानाबाहेर असलेल्या काहीश्या अनधिकृत बांधकामावर जबरदस्त कारवाई केली. प्रशांत कॉर्नरचा इतिहास माहित असलेल्यांपैकी मी आहे. ओपन हाऊसच्या समोर एक वडापाव चे दुकान होते. त्या दुकानाचे नाव होते प्रशांत कॉर्नर. तिथून प्रशांतने गरुडझेप घेतली आणि आज ठाण्यातील सर्वात मोठा मराठी मिठाईवाला अशी त्याची ओळख आहे. ठाण्यातील कुठल्याही परिसरात जा तुम्हांला प्रशांत कॉर्नरचे दुकान दिसेलच.

- Advertisement -

सर्वात कौतुकाची बाब ही आहे की, तो अत्यंत गरीबीतून पुढे आला आहे. एका दलित कुटुंबामध्ये जन्म घेऊन इथपर्यंत भरारी मारणं ही सोपी गोष्ट नाही. ही कारवाई कोणाच्या आदेशाने करण्यात आली ? का करण्यात आली ? याबाबत अनेक कथा आता कानावर येत आहेत. त्याच्यातील किती खरं आहे आणि किती खोट ? हे फक्त प्रशांत सकपाळ यालाच माहित. माझा एकच प्रश्न मा. महापालिका आयुक्तांना आहे, की याचे एकाचेच दुकान तुम्हांला दिसले का ? इतर करोडो रुपयांची बांधकामे ठाण्यात होत असतांना एका मागासवर्गीय दलित माणसाच्या दुकानावर आपण ही कारवाई करावी हे शोभणारं नाही. काहीवेळा आलेले आदेश धुडकावून लावायचे असतात. किंवा देणा-याला शांत करायचं असतं.

- Advertisement -

ठाण्याचा एक नागरिक म्हणून, आमदार म्हणून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खंदा समर्थक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो.

ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात ‘प्रशांत कॉर्नर’ हे मिठाईचे दुकान आहे. या दुकानांमध्ये मिठाई घेण्यासाठी दररोज मोठी गर्दी असते. या दुकानासमोरील जागेत एक शेड उभारण्यात आली होती आणि काही बांधकामही करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या बेकायदा बांधकामावर पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.


हेही वाचा : नव्या संसद भवनाची इमारत बांधताना आम्हाला विचारात घेतलं नाही- शरद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -