घरताज्या घडामोडीNanded : चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शाहांची तोफ धडाडणार, भाजपने आखली रणनिती

Nanded : चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शाहांची तोफ धडाडणार, भाजपने आखली रणनिती

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे थेट मैदानात उतरले आहेत. नांदेडमध्ये येत्या १० जूनला अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात शाहांची तोफ धडाडणार असून भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.

चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शाहांची तोफ धडाडणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला ३० मे रोजी ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने १ जून ते ३० जूनच्या दरम्यान देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह १० जूनला नांदेडमध्ये येणार असून सायंकाळी ५ वाजता अबचलनगर, बाफना येथे जाहीर सभा होणार आहे.

- Advertisement -

सोमवारी शासकीय विश्रामगृहावर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत जिल्हा, मंडळ शक्ती केंद्र आणि बूथ पातळीवर वेगवेगळे स्वरूपाचे कार्यक्रम घेत सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

नांदेड हा अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद आहे. मविआ एकत्र लढल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करून अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अबचलनगर भागातील खुल्या मैदानात ही सभा होणार असून, त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या सभेला पन्नास हजारांहून अधिकचे लोक उपस्थित राहतील, असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.

- Advertisement -

भाजपचं ‘संपर्क से समर्थन’ अभियान

भाजपचं ‘संपर्क से समर्थन’ यापासून हे अभियान सुरु झाले आहेत. या अभियानात सर्व नेते, मंत्री सहभागी घेणार असून देशपातळीवर एका मंत्र्याला दोन लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते मंडळी त्यांच्या विभागातील नेत्यांच्या घरी जाऊन सरकारच्या ५५० विविध योजनांची माहिती देणार आहे.

राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. भाजपकडून गुप्तपद्धतीने हालचाली सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रातले दौरे वाढत आहे. नवी मुंबई येथील खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पाडला. या सोहळ्याला अमित शाह यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले होते.


हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, राजकीय चर्चांणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -