घरमुंबईShrikant Shinde : मुंबईतील कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण, पालिका अनुकूल

Shrikant Shinde : मुंबईतील कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण, पालिका अनुकूल

Subscribe

मुंबई: मुंबईतील रखडलेल्या कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाबाबत मुंबई महापालिका नव्याने धोरण बनवणार आहे. या पुनर्विकासात एफएसआयचा वापर व डीसीआरबाबतच्या कामाला पालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे कोळीवाडयांचा विकास होऊन कोळीवाड्यातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती शिवसेना ( शिंदे) गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे पालिका आयुक्त चहल यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील काही महत्वाच्या समस्या, प्रश्न, विकासकामे आदींबाबत त्यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन चर्चा केली. मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे आहेत. या ठिकाणी राहणारे कोळी बांधव हे मूळ रहिवासी आहेत. त्यांची कुटुंबे वाढत असून त्यांना राहण्यासाठी सध्याच्या घरातील जागा ही अत्यंत अपुरी पडत आहे. घरावर वरचा मजला चढवला तर तो बेकायदेशीर ठरवून महापालिकेकडून त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे कोळीवाड्यांचा पुनर्विकास मार्गी पावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त चहल यांची मंगळवारी भेट घेतली.

- Advertisement -

मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. त्यांना आपल्‍या राहत्‍या घराची दुरूस्‍ती करताना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे मूळ मुंबईकरांच्‍या पुनर्विकासासाठी स्‍वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी तसेच त्‍यांना अतिरिक्‍त एफएसआय देण्‍यात यावा, कोळवाडे आणि गावठाणांचे सिमांकन करण्‍यात यावे. इमारतींचा पुनर्विकास करताना उंचीची मर्यादा असल्‍यामुळे विकास करताना अडचणी येतात, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. कोळीवाडयांचा पुनर्विकास होण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सत्तांतर होऊन ठाकरे सरकार पायउतार झाले. आता शिंदे व फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाला चलना मिळणार आहे, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

‘मुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करा’

मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच शहरातील कोळीवाडे पर्यटनदृष्ट्या आकर्षणाचे केंद्रबिंदू व्हावेत यासाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांचे सुशोभीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी दिले होते. मुंबईतील कोळीवाड्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करून कोळीवाडे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होतील यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होण्यास मदत होईल. तेथील संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची ओळखही देशविदेशातील पर्यटकांना होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

- Advertisement -

माझं कोळी व्यवसायाशी साम्य

“अनेक वादळं आलेली आपण पाहिली असतील. पण आपला कोळी बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता या खवळलेल्या समुद्रात देखील आपला उदनिर्वाह आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी मासेमारी करतो. हा कोळी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये राहत आहे. मलाही या कोळी बांधवांचा जिव्हाळा आहे. मी कोळी नसलो तरी, माझं कोळी व्यवसायाशी साम्य आहे. एकेकाळी माश्यांचा व्यवसाय मी करत होतो. मी भाऊच्या धक्क्यावर येऊन मासेमारांना जवळून पाहायचो. त्यामुळे माझे या कोळी समाजाशी साम्य आहे”, असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी  कोळीवाड्यातील सत्कारावेळी केली होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -