घरमहाराष्ट्रभाजपचे "मिशन 2024"; 48 मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर

भाजपचे “मिशन 2024”; 48 मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर

Subscribe

भाजपने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्यापही टांगणीला लागलेल्या असलेल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यास सुरूवात केली आहे. भाजपने तर लोकसभांकडे विशेष पद्धतीने लक्ष देण्यासाठी प्रत्येकी एका नेत्याची निवड निवडणूक प्रमुख म्हणून केली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

हेही वाचा – स्वतःचा आनंद स्वतः निवडला… दुसऱ्या लग्नानंतर ट्रोल झालेल्या आशिष विद्यार्थींनी दिलं ट्रोलर्सला उत्तर

- Advertisement -

मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, प्रसाद लाड, धनंजय महाडिक, विनय सहस्रबुद्धे, मुरलीधर मोहोळ, राहुल कुल, महेश लांडगे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांवर देखील निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीला खासदार आणि आमदार उपस्थित राहिले होते. यावेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

‘या’ लोकसभांसाचे ‘हे’ आहेत निवडणूक प्रमुख

मुंबई उत्तर – योगेश सागर
मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
ठाणे – विनय सहस्रबुद्धे
मावळ – प्रशांत ठाकूर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
कोल्हापूर – धनंजय महाडिक
हातकणंगले – सत्यजीत देशमुख
सांगली – दीपक शिंदे
सातारा – अतुल भोसले
सोलापूर – विक्रम देशमुख
माढा- प्रशांत परिचारक
जालना – विजय औताडे

लातूर – दिलीप देशमुख
छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर
दिंडोरी – बाळासाहेब सानप
वर्धा – सुमीत वानखेडे
पुणे – मुरलीधर मोहोळ
बारामती – राहुल कुल
शिरुर – महेश लांडगे

ज्याप्रमाणे 48 लोकसभांसाठी निवडणुक प्रमुखांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 288 विधानसभा मतदारसंघासाठी देखील निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. या बाबतचे ट्वीट चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली असून आता  शिवसेना आणि भाजप जागा वाटपाबाबत नेमका कोणता तगडा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -