कपिल शर्मा याचे सध्या तारे जोरात आहे. कपिलच्या लग्नानंतर त्याचा शो पुन्हा एकदा सुरु झाला आहे. या कॉमेडी शोमध्ये पून्हा बॉलिवूड कलाकार येत आहेत. कपिलची जीवनशैली पून्हा पहिल्यासारखी होत असतानाच अजून एक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे कपीलची सोशल मीडियावरून पून्हा निंदा केली जात असल्याचे समजत आहे. कपिलच्या शो साठी आलेल्या एका महिलेवर त्याने टिप्पणी केली आहे. ही टीप्पणी एका क्रू मेंबरला आवडली नसल्यामुळे त्याने याची तक्रार सलमान खानला केली. सलमान हा या शोचा प्रोड्युसर आहे. यामुळे आता कपिलच शो मध्ये एका नव्या वादाला तोंड फुटेल असे चित्र आहे.
View this post on Instagram
ਅਨੰਦ ਕਾਰਜ ?? @ginnichatrath @kaleereinbykanikakumria @punitarora.in @deepikasdeepclicks
असे काय केलं कपीलने
कपील शर्माच्या कॉमेडी शोमध्ये कपील ऑडियन्सलाही सामील करतो. एका शोमध्ये ऑडियन्समध्ये बसलेल्या महिलेशी त्याने संवाद साधला. या संवादानंतर “जर तुमचे वडिल येथे आले नसते तर तुमच्याशी अजून चर्चा केली असती.” अशी टिप्पणी कपिलने केली. या कमेंटवरून जरी त्या महिलेने कोणता आक्षेप घेतला नसला तरी कपीलच्या क्रू टीमला ही गोष्ट पटली नाही. त्यांनी याची तक्रार सलमान जवळ केली. मागील अनेक महिन्यांपासून कपिल हा वाईट कामांमुळे चर्चेचा विषय बनला होता. यानंतर त्याचे लग्न झाले लग्नानंतर त्याने आपल्या शो ला पून्हा नव्याने सुरुवात केली.