घरमुंबईबाळासाहेबांच्या नावाची मंडईही भाड्याने

बाळासाहेबांच्या नावाची मंडईही भाड्याने

Subscribe

जोगेश्वरीतील मंडई २० वर्षांकरता भाडेकराराने, सत्तेत शिवसेना असूनही बाळासाहेबांच्या नावाचा बाजार

मुंबई फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने पाऊल उचलले असून फेरीवाल्यांसह काही प्रकल्पबाधित दुकानदार आणि गाळेधारकांचे पुनर्वसन मंडईंमध्ये करण्याचा विचार सुरु आहे. मात्र, एका बाजुला मंडईतील गाळे अपुरे असून गाळेधारकांचे पुनर्वसन करता येत नसताना दुसरीकडे महापालिका नव्याने बांधलेली मंडई भाड्याने देण्याचा घाट घालत आहे. जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे मंडई वीस वर्षांकरता भाडेकरारावर देण्यात येत आहे. शिवसेनेने या मंडईला बाळासाहेबांचे नाव दिले. परंतु सत्तेत असलेल्या शिवसेनेला या मंडईचीही देखभाल करता येत नाही.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पुनम नगर येथे महापालिकेची तळ अधिक दहा मजल्याची इमारत आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मंडईचे नामकरण शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि शिवसेना नगरसेवक बाळा नर यांच्या मागणीनुसार हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मंडई असे केले. परंतु आता ही मंडईच भाडेकरारावर देण्यात येत आहे. तळ अधिक पाच मजले आणि १० मजल्यांच्या वापराकरता निविदा मागवली होती. यामध्ये तळ अधिक पाच मजल्यांच्या जागा जय मल्हार एंटरप्रायझेस या कंपनीने तर दहावा मजला शिमर डेकोरेटर्स अँड इव्हेंटस या कंपनीने मिळवल्या आहेत. तळ मजल्याची जागा ३१ टक्क्यांमध्ये मिळवली आहे तर उर्वरीत चार मजल्यांची जागा ४० टक्क्यांमध्ये मिळवली आहे. दहाव्या मजल्याची जागा ही ४५ टक्क्यांमध्ये मिळवली गेली आहे. त्यामुळे मासिक २२ लाख ४३ हजारांमध्ये मंडईची ही जागा खासगी कंपनीच्या घशात घातली जात आहे.

- Advertisement -

या कंपनीला प्रथम दहा वर्षांकरता आणि वाढीव दहा वर्षांकरता अशाप्रकारे एकूण २० वर्षांकरता भाडेकरारावर दिल्या जात आहेत. मुंबईतील अनेक रस्ते व अन्य विकास प्रकल्पांतर्गत बाधित होणार्‍या दुकान व गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी मंडईमध्ये गाळे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडलेले असताना, महापालिका अशाप्रकारे स्वत:ची मंडई भाड्याने देण्याचा प्रयत्न करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवसेनेने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटरचे नामकरण हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे केले. परंतु या हॉस्पिटलची वाटचाल आता खासगीकरणाकडे असतानाच आता शिवसेनेने नामकरण केलेल्या जोगेश्वरीतील हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मंडई भाड्याने देत त्यांचे खासगीकरण केले जात आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता उपभोगणार्‍या शिवसेनेला बाळासाहेबांचे नाव दिलेल्या वास्तूही धड सांभाळता येत नाही का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याला तीव्र विरोध करत शिवसेनेने किमान बाळासाहेबांचे नाव दिलेल्या वास्तूंचे तरी खासगीकरण करू देवू नये, असे सांगत त्यांचा समाचार घेतला. तसेच सध्या आपल्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी गाळे नसताना आपल्या मंडई भाडेतत्वावर का दिल्या जाव्यात, असाही सवाल त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -