घरमहाराष्ट्रMaharashtra Budget : विरोधकांचा नाराजीचा सूर

Maharashtra Budget : विरोधकांचा नाराजीचा सूर

Subscribe

विधानसभेत सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पाविरोधात विरोधी पक्ष नेत्यांच्या नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे.

विधानसभेमध्ये मांडल्या जात असलेल्या महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते जोरदार टीका करत आहेत. ‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मुळात परवानग्या नव्हत्या, तर पंतप्रधानांनी जलपूजन कशाला केले?’ असा सवाल उपस्थित करत ‘हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे’, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर या चर्चेत सहभाग घेताना धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुंडे म्हणाले की, ‘महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना ८ पानी पत्र लिहीले होते. त्यातसुद्धा त्यांनी स्मारकाचे कंत्राट कशाप्रकारे चुकीचे दिले आहे हे सांगितले होते.’ ‘तरी याचा खुलासा आता सभागृहात व्हायला हवा’ अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली.

‘हे सरकार परवानग्या घेत नाही. छत्रपतींचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाते आहे साधा पुतळा उभारला जात नाही हे लक्षात घ्या. सरकार स्मारकाची उंची कमी करते याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. सरकार याबाबत का भूमिका स्पष्ट करत नाही?’ अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी सरकारला केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत विनायक मेटे यांनी दिलेल्या पत्राचा आणि कामाला स्थगिती का आली आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. आमदार सतीश चव्हाण यांनीही यावेळी भूमिका मांडली. यावर सरकारतर्फे भूमिका मांडली जात नसल्याने विरोधी आमदारांनी गोंधळ घातल्याने सभापतीनी सभागृहाचे कामकाज तहकुब केले.

- Advertisement -

‘अन्न दाता दु:खी भव:’ अशी स्थिती

”राज्याच्या अर्थमाजत्र्यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ दिसत नाही. तसेच आर्थिक तरतूद देखील दिसत नाही. सरकारच्या कामात जोर नसल्याने त्यांनी मोठ्यामोठ्याने ओरडून आर्थसंकल्प मांडला. सरकारचा मागचा कार्यकाल पाहिला, तर अन्न दाता दु:खी भव: असे म्हणावे लागेल. दुष्काळात शेतकरी आणि जनता होरपळून निघाली आहे. बेरोजगारांसाठी आता नवीन संधी देऊन युवकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. २ कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली मात्र तरी आज बेरोजगारी आहे. हा तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. विखे पाटील यावेळी म्हणाले :

अर्थमंत्र्यांच्या भाषणात जोर होता पंरतु पेश्याच्या बाबतीत जोर नसल्याने सगळा बोजवारा उडाला आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही. प्रत्येक दुष्काळी भागात गेलात तर याचे खरे वास्त समोर येईल.

दुष्काळाने जनता होरपळुन निघाली आहे. त्यांना भरघोष आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

बेरोजगारांचा असंतोष कमी करण्यासाठी नविन गाजर दाखविण्यात आले आहे.

गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार पदे भरली जातील अशी घोषणा केली होती. परंतु आतापर्यंत एकही पद भरले गेले नाही.

अर्थसंकल्प की निवडणूक प्रचाराचे भाषण?

‘आज भाजप सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या हातात अक्षता देण्याचा प्रकार असून, राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

अर्थसंकल्प मांडताना सुधीर मुनगंटीवार यांच्या चेहऱ्यावर आगामी निवडणुकीतील पराभव स्पष्ट दिसत होता अशी जोरदार टिका आमदार जयंत पाटील यांनी केली.

हा अर्थसंकल्प न राहता जनतेच्या नजरेत पुन्हा एकदा येण्याची एक केविलवाणी कृती असल्याचे दिसत होते, असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

राज्यात सध्या भयावह दुष्काळ पडलेला असताना हे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना जाहीर करेल असे अपेक्षित होते, मात्र शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना या सरकारने जाहीर केलेली नाही.

विविध महत्वाच्या योजनांसाठी केलेल्या तरतुदी अत्यंत अपुऱ्या असून, त्यातून काहीही साध्य होणार नाही.

राज्यायुवकांना रोजगार देण्याचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या या सरकारने युवकांच्या रोजगारासाठी या अर्थसंकल्पात भरीव कोणतीही योजना सादर केलेली नाही.

प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेचे अपयश आम्ही वारंवार अधोरेखित केले असूनही, या योजनेसाठी सरकारने केवळ ९० कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या या सरकारने छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक विटही रचलेली नाही.

घोषणा केलेला एकही महत्वाचा प्रकल्प या सरकारने पूर्ण केलेला नाही असाही आरोप आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -