घरमहाराष्ट्रमोदी साडीनंतर आता बाजारात आलीये 'आर्मी साडी'

मोदी साडीनंतर आता बाजारात आलीये ‘आर्मी साडी’

Subscribe

'मोदी' साडीनंतर आता 'आर्मी' साडी सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्याचा राग संपूर्ण देशांमध्ये पसरला होता. तो राग नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र सुरत मधील एका व्यापाऱ्याने आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी या परिस्थितीचा फायदा घेतला आहे. दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाले, त्यांना मानवंदना देण्यासाठी सशस्त्र सैनिकांच्या प्रिंटची साडी या व्यापाऱ्याने छापली आहे. परंतु साडी छापल्यानंतर लक्षात आले की, प्रिंट केलेल्या साडीवरील सशस्त्र सैनिक हे भारतीय सैनिक नसून अमेरिकेचे सैनिक आहेत.

साडीवर अमेरिकन सैन्य 

‘झू बिअर’ (zoo bear) या ट्विटर अकाऊंटवर ट्विट झाल्यानंतर ही घटना निर्दशनास आली. या साडीवरील प्रिंट अमेरिकेच्या सैन्याची असून त्या साडीच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली आहे. या साडीवर छापलेल्या प्रिंटवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

Surat traders design saris depicting outrage over Pulwama Attack. But uses US Soldiers instead of Indian Soldiers?‍♂️ pic.twitter.com/UNyoZ3lg1k

— Zoo Bear (@zoo_bear) March 2, 2019

- Advertisement -

त्यासंबंधी अजून एका साडीचे ट्विट केले आहे.

Here is one more… pic.twitter.com/AxvKWGcWn4

— Zoo Bear (@zoo_bear) March 2, 2019

भारतीय समजून अमेरिकन सैनिकांची साडीवर प्रिंट छापली त्यावर नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.

Surat traders design saris depicting outrage over Pulwama Attack. But uses US Soldiers instead of Indian Soldiers?‍♂️ pic.twitter.com/UNyoZ3lg1k

— Zoo Bear (@zoo_bear) March 2, 2019

Surat traders design saris depicting outrage over Pulwama Attack. But uses US Soldiers instead of Indian Soldiers?‍♂️ pic.twitter.com/UNyoZ3lg1k

— Zoo Bear (@zoo_bear) March 2, 2019

मोदी प्रिंट साडी

काही दिवसांपूर्वी पुलवामामध्ये भारतीय जवानांनवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी एका व्यापाराने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही प्रत्येक हल्लाच्या ३ ते ४ तासांमध्ये वेगवेगळ्या साड्या बनविल्या आहेत. तसेच त्या साडीवरही सैनिकांची प्रिंट छापली होती ती भारतीय सैनिकांचीच होती. त्या साडीला ‘मोदी साडी’ म्हणूनही ओळखले जात आहे. त्या साडीला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -