घरदेश-विदेशभाजपच्या 'चौकीदार'नंतर हार्दिक पटेलची नवी मोहिम 'बेरोजगार हार्दिक पटेल'

भाजपच्या ‘चौकीदार’नंतर हार्दिक पटेलची नवी मोहिम ‘बेरोजगार हार्दिक पटेल’

Subscribe

हार्दिक पटेल यांनी देखील नवी मोहिम सुरु केल्यानंतर 'बेरोजगार हार्दिक पटेल' असे लिहिले आहे. त्यांच्या या मोहिमेची आता जोरदार चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर सुरु केलेल्या मै भी चौकीदार या मोहिमेला देशभरातील लाखो लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या समर्थनार्थ भाजपच्या अनेक नेत्यांसह जनतेने मै भी चौकीदार हा हॅशटॅक आपल्या ट्विटर अकाऊंटवर ठेवला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मोहिमेला काँग्रसचे नेते आणि गुजरातच्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी ‘मै भी चौकीदार’ या भाजपच्या हॅशटॅगला उत्तर देत त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावापुढे ‘बेरोजगार’ लिहिले आहे. हार्दिक पटेल यांनी देखील नवी मोहिम सुरु केल्यानंतर ‘बेरोजगार हार्दिक पटेल’ असे लिहिले आहे. त्यांच्या या मोहिमेची आता जोरदार चर्चा होत आहे.

hardik patel twiteer

- Advertisement -

भाजपच्या मोहिमेला उत्तर

काँग्रेसकडून सतत होणाऱ्या ‘चौकीदार चोर है’ या आरोपाला उत्तर देत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ‘मै भी चौकीदार’ ही मोहिम सुरु केली. पाहता पाहता सोशल मीडियावर मोदींच्या या मोहिमेची जोरदार चर्चा होऊ लागली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांपासून भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि समर्थकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘मै भी चौकीदार’ असे लिहायला सुरुवात केली. मोदींच्या या नव्या मोहिमेची जोरदार चर्चा झाल्यानंतर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरील नावापुढे ‘चौकीदार’ असे लिहायला सुरुवात केली.

देशातील बेरोजगारांचा प्रश्न केला उपस्थित

मोदींच्या या मोहिमेला काँग्रेसने कडाडून उत्तर दिले आहे. याला उत्तर देताना काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी आपले नाव ‘बेरोजगार हार्दि पटेल’ असे ठेवले आहे. असे सांगितले जात आहे की, या मोहिमेच्या माध्यमातून हार्दिक पटेल या देशातील बेरोजगारीची समस्या जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर नाव बदलल्यानंतर हजारो युजर्सने हार्दिक पटेल यांचे समर्थन केले आणि बेजोरगारीच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा केली. बेरोजगारीचा हिस्सा बनलेले ट्विटर्स युजर्स खूप खूश आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -