घरमनोरंजनश्रीलंका बॉम्बस्फोटामुळे बॉलिवूडकरही हळहळले

श्रीलंका बॉम्बस्फोटामुळे बॉलिवूडकरही हळहळले

Subscribe

श्रीलंकेची राजधानी कोलंबो आज सकाळीच साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.४५ मिनिटांनी पहिला बॉम्बब्लास्ट झाला आणि श्रीलंकेच्या राजधानीत खळबळ उडाली. एकामागोमाग एक असे एकूण ८ बॉम्बस्फोट आत्तापर्यंत झाले असून त्यामध्ये सुमारे १८५ नागरिकांचा बळी गेला असून ५००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असतानाच हे स्फोट झाले. यामध्ये कोलंबोतील बट्टीकलोआ, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया हे तीन चर्च आणि दोन फाइव्ह स्टार हॉटेलांचा समावेश आहे. या हल्ल्याचा प्रत्येक स्तरातून निषेध केला जात आहे.

बॉलिवूडमधील कलाकारांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

- Advertisement -

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही ट्विट करत हल्ल्याचा निषेध केला आहे. दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री हुमा कुरेशीनेही या घटनेविषयी तिचं मत व्यक्त केलं आहे. “ईस्टर डे च्या दिवशी जे नागरिक चर्चमध्ये जात होते.  हा हल्ला प्रचंड वेदनादायी आहे. हे नक्की काय सुरु आहे?”, असं म्हणत हुमाने तिचा संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हा हल्ला आयएसआयच्या इशाऱ्यावरुन करण्यात आल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. झाल्याची माहिती समोर आली आहे.  हे बॉम्बस्फोट झाले असून ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका हादरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -