घरअर्थजगतपीएफवर ८.६५ टक्के दराने व्याज मिळणार

पीएफवर ८.६५ टक्के दराने व्याज मिळणार

Subscribe

पीएफवरील व्याज वाढून ८.६५ टक्के होणार

आर्थिक वर्ष २०१८-२०१९ नुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीवर ८.६५ टक्के दराने व्याज मिळणार असून यासंदर्भातील माहिती शुक्रवारी केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार असल्याचा दर कामगार मंत्रालयाने यापूर्वीच हा दर मंजूर केला आहे. मात्र, याची मंजुरी अर्थ मंत्रालयाने अद्याप दिली नसल्याने या दराची अंमलबजावणी झालेली नाही.


हेही वाचा- १० बँकांचे विलीनीकरण

भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) सहा कोटी सदस्यांना या वाढीव व्याज दराचा फायदा होणार आहे. तसेच, २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर ८.५५ टक्के व्याज देण्यात आले होते. या प्रकरणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाची वेगळी भूमिका नसून त्यांनाही हा दर मान्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -