घरअर्थजगतउद्यापासून चार दिवस देशभरातील बँका बंद

उद्यापासून चार दिवस देशभरातील बँका बंद

Subscribe

सणानिमित्त देशाच्या विविध राज्यांमध्ये 18 ते 21 ऑगस्ट रोजी बँका राहणार बंद; महत्वाची कामे आजच पूर्ण करा

ऑगस्ट महिन्यात सण – समारंभांना सुरुवात होते. नुकतंच राक्षबंधनाचा सण झाला. तर काही महत्वाचे आगामी काळात येणार आहेत. त्यामुळे उद्यापासून पुढलं 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2022 पर्यत बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती आजच पूर्ण करून घ्या.

हे ही वाचा – शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

- Advertisement -

या दिवशी बँका राहणार बंद

या आठवड्यात गोकुळाष्टमी आल्याने त्यादिवशी बँका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर लगेचच रविवारची सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत. याआधीही रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टी निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. या आठवड्यात 18 ते 21 ऑगस्ट या दोन दिवशी गोकुळाष्टमी निमित्त बँका बंद राहणार आहेत. आणि 21 ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी असल्याने बँक बंद राहणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मुकेश अंबांनी दोन वर्षे पगाराविनाच, का ते वाचा!

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही सुट्ट्या

आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, ऑगस्टमध्ये एकूण 18 दिवस बँक सुट्ट्या नियोजित आहेत. त्यानुसार या आठवड्यात 4 सुट्ट्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 4 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. तर 27 आणि 28 ऑगस्टला चौथा शनिवार आणि रविवार या दिवशी आठवड्याची सुट्टी असेल. 29 ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त तर 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे तुम्हालाही तुमची काही महत्चाची कामं असतील तर ती आजच पूर्ण करून घ्या.

हे ही वाचा – नोटाबंदी फसली? बोगस नोटांचा बाजारात पुन्हा सुळसुळाट

वेगवेगळ्या राज्यांनुसार बँकांना सुट्ट्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपल्या कॅलेंडरमध्ये ज्या बँकिंग सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरवते त्यानुसार प्रत्येक राज्यांत बँकांना सुट्ट्या असतात. अनेक राज्य आणि शहरांमध्ये बँकांच्या सुट्ट्या सण आणि उत्सवाच्या आधारावर ठरवल्या जातात. मात्र, या सुट्यांमध्ये तुम्ही तुमचे काम ऑनलाइन बँकिंग सेवेद्वारे करू शकता. त्यामुळे तुमचे अतिमहत्त्वाचे काम खोळंबून राहणार नाही.

18 ऑगस्ट – भुवनेश्वर, डेहरादून, कानपुर आणि लखनऊ मधील बँकांना सुट्टी असणार आहे.

19 ऑगस्ट – अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पटना, रांची, रायपूर, शमला आणि शिलॉंग मधील बँकांना सुट्टी असणार आहे.

20 ऑगस्ट – हैदराबाद मधील बँकांना सुट्टी असणार आहे.

21 ऑगस्ट – रविवार आठवड्याची सुट्टी

31 ऑगस्ट – महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात मधील बँकांना सुट्टी असणार आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -