घरअर्थजगतCISF Recruitment 2021: सीआयएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल जीडीपदांसाठी मोठी भरती, १२ वी पासना...

CISF Recruitment 2021: सीआयएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल जीडीपदांसाठी मोठी भरती, १२ वी पासना नोकरीची सुवर्णसंधी

Subscribe

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण CISF GD हेड कॉन्स्टेबल भरती २०२१ साठी अर्ज करू शकतात. याशिवाय तुम्ही ज्या खेळांतर्गत अर्ज करत आहात, त्या खेळाने राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा केलेली असावी.

नवी दिल्लीः CISF Head Constable GD Vacancy 2021: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी (जीडी) पदांवर मोठी भरती काढण्यात आलीय. सीआयएसएफमध्ये अनेक पदांवर जीडी हेड कॉन्स्टेबल वेकन्सी २०२१ (Constable GD Recruitment) नोटिफिकेशन जारी केलेय. तुम्ही CISF वेबसाईट cisf.gov.in ला भेट देऊन या नोकरीसंबंधीची माहिती तपासू शकतो. तुम्हाला या बातमीत दिलेल्या लिंकवरून सूचना आणि अर्ज दोन्हीची माहिती मिळणार आहे. तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, तर तुमच्यासाठी भारतात सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल GD
पदांची संख्या – २४९
वेतनमान – या पदांवर तुम्हाला पे मॅट्रिक लेव्हल ४ अंतर्गत दरमहा २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. या वेतनश्रेणीसोबतच केंद्र सरकारच्या नियमानुसार पूर्ण वेतनासह इतर भत्तेही मिळणार आहेत.
या भरती स्पोर्ट्स कोटा जॉब्स अंतर्गत केल्या जात आहेत.

- Advertisement -

कोणत्या खेळासाठी जागा रिक्त

ऍथलेटिक्स
बॉक्सिंग
बास्केटबॉल
जिम्नॅस्टिक
फुटबॉल
हॉकी
हँड बॉल
ज्युडो
कबड्डी
शूटिंग
स्वीमिंग
व्हॉली बॉल
वजन उचल
कुस्ती
तायक्वांदो

सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल जीडी पात्रता: आवश्यक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण CISF GD हेड कॉन्स्टेबल भरती २०२१ साठी अर्ज करू शकतात. याशिवाय तुम्ही ज्या खेळांतर्गत अर्ज करत आहात, त्या खेळाने राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा केलेली असावी.

- Advertisement -

वयोमर्यादा – अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे असावे. तुमच्या जन्मतारखेपासून ०१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वयाची गणना केली जाईल. तुमचा जन्म ०२ ऑगस्ट १९९८ ते ०१ ऑगस्ट २००३ दरम्यान झाला असेल तर तुम्ही या रिक्त पदासाठी अर्ज करू शकता.

अर्ज कसा करावा?

तुम्हाला CISF हेड कॉन्स्टेबल GD २०२१ च्या रिक्त पदासाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अर्जाचा नमुना अधिसूचनेसह प्रसिद्ध करण्यात आला आहे. तुम्ही खाली दिलेल्या नोटिफिकेशन लिंकवरून फॉर्म डाउनलोड करू शकता आणि प्रिंट आउट देखील घेऊ शकता. त्यानंतर तो फॉर्म व्यवस्थित भरा आणि नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर १०० रुपयांच्या पोस्टल ऑर्डर किंवा SBI DD सोबत पाठवा. एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरावे लागणार नाही. तुमचा अर्ज ३१ मार्च २०२२ रोजी (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) विहित पत्त्यावर पोहोचला पाहिजे. ईशान्येकडील राज्यांसाठी अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ०७ एप्रिल २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

निवड प्रक्रिया काय ?

सर्व प्रथम योग्यरित्या भरलेल्या अर्जांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. योग्य प्रक्रियेद्वारे अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी (PST) साठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्रे तपासली जातील. त्यानंतर चाचणी चाचणी आणि प्राविण्य चाचणी घेण्यात येईल आणि अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -