व्यवसाय करायचा आहे? आता सरकार देणार 10 लाखांपर्यंत कर्ज, व्याजही होईल माफ

PM मुद्रा योजनेंतर्गत लहान दुकानदार, फळ व्यापारी, फूड प्रोसेसिंग युनिट यांसारख्या छोट्या उद्योगांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे

pm mudra yojana know interest rate limit how to apply and other details

देशातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मुद्रा योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघु उद्योग सुरु करण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Mudra Yojana Loan) दिले जात आहे. 10 लाखांपर्यंतची ही कर्जे सहज आणि परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध आहेत. जर तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर करत राहिल्यास तुम्हाला कर्जाचा व्याजदरही माफ होईल.

कर्जाचे तीन श्रेणीत वितरण

पीएम मुद्रा योजनेंतर्गत मिळालेली कर्जे तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत. शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज या तीन श्रेणी आहेत. शिशू कर्जाअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर कर्ज अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तरुण कर्जाअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते.

ग्राहकांनो तयार! दिवाळीपर्यंत मिळणार 5G सेवा, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

कर्जासाठी असा भरा अर्ज

पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची आवश्यकता नाही आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तथापि कर्जाचे व्याज दर बँकेनुसार बदलू शकतात. मात्र हे प्रत्येक बँकांवर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 9 ते 12 टक्के व्याजदर राहणार आहे.

मुद्रा लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. अनेक बँकांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही https://www.mudra.org.in/ वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

अशाप्रकारे घ्या योजनेचा लाभ

PM मुद्रा योजनेंतर्गत लहान दुकानदार, फळ व्यापारी, फूड प्रोसेसिंग युनिट यांसारख्या छोट्या उद्योगांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेजिडेंशियल प्रूफ, पासपोर्ट साईजचे फोटो, बिजनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे.


LIC चा नवीन प्लान लाँच, जाणून घ्या काय आहे खास?