अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची सेबीकडून चौकशी सुरु

Adani group enters in health care after cement company acquisition
Adani Group ची आता आरोग्य क्षेत्रात एन्ट्री; ही या सरकारी कंपनीला घेणार विकत

आशियातील दुसरी सर्वात व्यक्ती श्रीमंत गौतम अदानींसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने ( SEBI) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अदानी ग्रुपच्या बहुतांश कंपन्यांची चौकशी सुरु केली आहे. यासंदर्भातील माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी संसदेत दिली. शेअर्सच्या वाढीमुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. मात्र अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअरमधील अनपेक्षित वाढीमुळे आता सेबीमार्फत स्वतंत्र चौकशी केली जात आहे.

मात्र अर्थ राज्यमंत्र्यांनी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील एफपीआयच्या गुंतवणुकीची चौकशी अंमलबजावणी संचालनालयमार्फत (ED) होत असल्याचे नाकारले. ते म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालय अदानी ग्रुपच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या शेअर्सच्या व्यवहाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या एफपीआयची हिस्सेदारी तपासत जात नाही.

परदेशी खात्यावर बंदी 

एनएसडीएलने अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंडांची विदेशी खाती गोठवली. त्यांच्याकडे अदानी समूहातील ४ कंपन्यांचे ४३,५०० कोटी रुपयांचे शेअर आहेत. एनएसडीएलच्या मते, नव्या नियमांनुसार विदेशी गुंतवणूकदारांना काही अतिरिक्त माहिती द्यायची होती जी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांची विदेशी फंड संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आतापर्यंत या कंपन्यांविषयीची अधिकृत माहिती अदानी समूह किंवा एनएसडीएलने दिली नाही किंवा ती जाहीरही केली नाही.