घरक्राइमबॅनरच्या वादातून मनसैनिकांवर हल्ला, तिघांना अटक

बॅनरच्या वादातून मनसैनिकांवर हल्ला, तिघांना अटक

Subscribe

नालासोपाऱ्यात बॅनर लावण्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांना जब्बर मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोसायटीतील जमावाकडून मनसैनिकांना मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नालासोपारा पूर्वेकडील यशवंत विवा मॉल टाऊनशिपजवळील मुख्य रस्त्यावर बॅनर लावण्यावरून झालेल्या वादातून मनसैनिकांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना काल रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडीओ वायरल झाला असून त्यात जमाव मनसैनिकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. या मारहाणीत मनसे कार्यकर्ते जखमी झाले आहे. या हल्ल्यात कमलेश पवार (३०), किरण कुमठेकर (२९) आणि सुभाष जाधव (४०) जखमी झाले असून त्यांच्यावर नालासोपाऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील सौरभ पांडे, अनिल सिंग यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे परप्रांतीय विरुद्ध मनसे असा वाद अद्यापही कमी झालेला नाही.

- Advertisement -

Coronavirus vaccine : ‘जॅब फॉर जॉब’, कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी अशी एम्प्लॉयर्सची इच्छा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -