घरदेश-विदेशLockDwon: ११ वर्षांचा मुलगा बनला श्रावणबाळ!; आई-वडिलांसह सायकलवरून केला प्रवास

LockDwon: ११ वर्षांचा मुलगा बनला श्रावणबाळ!; आई-वडिलांसह सायकलवरून केला प्रवास

Subscribe

ज्याप्रमाणे श्रावण बाळाने कावडीमधून आई-वडिलांना नेले होते तसेच या मुलाने आपल्या आई-वडिलांना सायकल रिक्षा चालवत थेट बनारसहून बिहार या आपल्या गावी पोहोचवले

कोरोनाच्या महासंकटामुळे मजूर आपल्या मूळ गावी परत जाताना दिसताय. मिळेल त्या गाडीने किंवा काहीच नाही तर पायी प्रवासाचा पर्याय निवडून हे अनेक मजूर कित्येक किलोमीटर पायी प्रवास करत आहे. मजूरांचा रोजगार कोरोनामुळे गेला असल्याने त्यांची होणारी ओढाताण तसेच कुटुंबासह होत असलेली फरपट व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून समोर येत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर ११ वर्षाच्या श्रावणबाळाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये ११ वर्षाच्या मुलगा दिसत आहे, जो आपल्या आईवडिलांना सायकल रिक्षामध्ये बसवून आपल्या मूळ गावी घेऊन जात आहे. तवारे आलम असे या मुलाचं नाव असून हा मुलगा आपल्या आई-वडिलांना सायकल रिक्षामध्ये बसवून स्वत: ती चालवत आहे. बनारस ते बिहार असा तो प्रवास करत असताना हा व्हिडीओ काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वडील रिक्षा चालवून थकतात तेव्हा तो ही रिक्षा चालवतो असे या व्हिडीओमध्ये तो मुलगा सांगताना दिसतोय. ज्याप्रमाणे श्रावण बाळाने कावडीमधून आई-वडिलांना नेले होते तसेच या मुलाने आपल्या आई-वडिलांना सायकल रिक्षा चालवत थेट बनारसहून बिहार या आपल्या गावी पोहोचवले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भावूक होऊन त्याचे कौतुक केले आहे. तसेच या व्हिडीओवर निःशब्द , आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.


महाराष्ट्रातून यूपीमध्ये मजूराची सायकलवारी; ३५० किमीचा केला प्रवास आणि झाला मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -