घरताज्या घडामोडीToolKit Case: दिशा रवीची एक दिवसासाठी पोलीस कस्टडीत रवानगी!

ToolKit Case: दिशा रवीची एक दिवसासाठी पोलीस कस्टडीत रवानगी!

Subscribe

टूलकिट प्रकरणातील आरोपी पर्यावरणवादी दिशा रवीची पटियाला हाउस कोर्टाने आणखीने एका दिवसासाठी पोलीस कस्टडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी पाच दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती. आता पोलिस कस्टडी दरम्यान आरोपी दिशा रवीसोबत आरोपी शंतनु मुळूक आणि आरोपी निकिता जॅकब यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.

टूलकिट प्रकरणी आरोपी दिशा रवीला पटियाला हाउस कोर्टमध्ये सोमवार दाखल केले होते. आज दिशा रवीची तीन दिवसाची न्यायालयीने कोठडीची मुदत संपली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कोर्टाला सांगितले की, ‘याप्रकरणी शंतनू आणि निकिता जॅकब दोन आरोपी आहेत. शंतनूला तिथल्या कोर्टाने १० दिवसांची ट्रांजिट बेल दिली आहे. तर निकिता जॅकबला हायकोर्टने ट्रांजिट बेल मिळाली आहे. दिशा रवीने तिच्यावर लावले सर्व आरोप शंतनू आणि निकितावर लावले आहेत. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडे सर्व आरोपींना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्याशिवाय पर्याय नाही आहे.’

- Advertisement -

याआधी निकिताला चौकशी संदर्भात नोटिस देण्यात आली होती, परंतु चौकशीत ती सामील झाली नाही आणि हायकोर्ट गेली. पोलीस म्हणाले की, ‘टूलकिटवर अनेक हायपर लिंक दिल्या गेल्या होत्या, ज्या एका दुसऱ्या पेजवर घेऊन जात होत्या. ११ जानेवारी ही सर्व गोष्ट सुरू झाली होती. टूलकिटवर ज्या हायपर लिंक होत्या, त्या सर्व भारता विरोधात कट रचणाऱ्या होत्या. त्यामुळे आपल्या जनतेसमोर याबाबत जास्त काही बोलणार नाही.’


हेही वाचा – ToolKit Case: दिशा रवीला जामीन नाही; न्यायालय २३ फेब्रुवारीला देणार निर्णय

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -