योगगुरू बाबा रामदेव नेपाळमध्ये सुरू करणार टीव्ही चॅनेल्स, पंतजलीची उलाढाल वाचा

२०१८ मध्ये डेअरीचे प्रॉडक्टस लॉंच...

योगगुरू बाबा रामदेव पंतजली आयुर्वेदाची सुरूवात नेपाळमध्ये करणार आहेत. व्यावसायिक धोरणाची समीक्षा करण्यासाठी वनस्पतींना काठमांडूपर्यंत पोहोचवणार आहेत. अशी माहिती पतंजली योगपीठ आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रामदेव बाबा नेपाळच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण सुद्धा आहेत. बाबा रामदेव शुक्रवारी आस्था नेपाळ टीव्ही आणि पतंजली नेपाळ टिव्हीची सुरूवात करणार आहेत.

योगगुरू पतंजली कर्मचाऱ्यांसाठी पतंजली सदन व्यतिरिक्त स्वदेशी समृद्धी कार्डचं उद्घाटन देखील करणार आहेत. दरम्यान, पतंजली आयुर्वेद समूहाद्वारे विकसीत करण्यात येणाऱ्या एका परियोजनेचं निरीक्षण करण्यात येणार आहे.

आयुर्वेदिक आणि स्वदेशी वस्तूंपासून पतंजली- योग गुरू बाबा रामदेव यांनी पतंजलीद्वारे देशात आयुर्वेदिक आणि स्वदेशी वस्तूंवर जोर दिला जातोय. त्यामुळे पतंजलीच्या वस्तूंबाबत एवढी क्रेझ लोकांच्या मनात वाढली आहे. या गोष्टींचा विचार करताना पतंजलीने FMCG सेक्टरमध्ये अनेक विदेशी ब्रँडला मागे टाकलं आहे. बाजारात आपल्या वस्तूंच्या हिमतीवर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

२०१८ मध्ये डेअरीचे प्रॉडक्टस लॉंच

२०१८ मध्ये पतंजलीने पहिल्यांदाच डेअरी प्रॉडक्टस लाँच केले आहेत. तेव्हापासूनच सुनील बंसल कंपनीसोबत जोडले गेले आहेत. पतंजलीच्या डेअरीची सुरूवात दूधापासून झाली होती. त्यानंतर रामदेव यांनी दही, ताक आणि पनीर अशा प्रकारच्या वस्तू बाजारात घेऊन आणण्यास सुरूवात केली. लॉन्चिंगच्या वेळी पतंजलीच्या डेअरी वस्तूंची एक हजार कोटी रूपये विक्री झाली. पतंजलीला डेअरीमधून भरपूर फायदा झाला आहे.

२०१८ मध्ये पतंजलीने डेअरीच्या वस्तू लॉन्च करत २०१९ मध्ये रूची सोयाचं अधिग्रहण करण्यात आलंय. या कंपनीला विकत घेण्यासाठी पतंजलीने ३ हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज घेतलं आहे. यामध्ये सर्वात जास्त कर्ज हे एसबीआयमधून घेण्यात आलं आहे.


हेही वाचा: St workers Strike : मोठी बातमी ! एसटीच्या खाजगीकरणावर परिवहन मंत्र्यांचे वक्तव्य, म्हणाले…


पतंजलीची उलाढाल

१०१९-२० वर्षामध्ये आयुर्वेदचा नेट प्रॉफिट जवळपास २२ टक्क्यांच्या सरासरीपेक्षा ४२४ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला होता. वर्ष २०१८ ते २०१९ मध्ये पतंजली आयर्वेद एकूण ३४९ कोटींपेक्षा जास्त फायदा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ५ टक्क्यांच्या वर जाऊन ९ हजार २२ कोटींपर्यंत पोहोचला आहे. तसेच २०२० आणि २०२१ मध्ये पतंजलीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.