घरदेश-विदेशनरेंद्र मोदींच्या पक्षाकडून मुस्लिमांवर अत्याचार, बिलावल भुत्तो पुन्हा बरळले

नरेंद्र मोदींच्या पक्षाकडून मुस्लिमांवर अत्याचार, बिलावल भुत्तो पुन्हा बरळले

Subscribe

नवी दिल्ली – ओसामा बीन लादेन मेला पण, गुजरातचा कसाई जिवंत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. नेरेंद्र मोदी यांच्या पक्षाकडून भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप बिलावल यांनी केलाय. वॉशिंग्टन डीसीमध्ये ब्लूमर्ग टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून भारतीयांनी त्यांचा कडाडून विरोध केला होता. तसंच, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. बिलावल यांचे वक्तव्य असभ्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं. मात्र, तरीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लादेन मेला असला तरी गुजरातचा कसाई जिवंत.., पाकिस्तानी मंत्र्याचं वादग्रस्त विधान

नरेंद्र मोदी यांच्या पक्षाकडून भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होतात. भारत सरकार गुजरातमधील मुस्लिमांवर खूप अत्याचर करत आहे, असं बिलावल भुत्तो म्हणाले आहेत.

- Advertisement -

याआधी काय म्हणाले होते बिलावल भुत्तो

ओसामा बिन लादेन मेला आहे, हे मी भारताला सांगू इच्छितो, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे. मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत, असं बिलावल भुत्तो म्हणाले होते.

हेही वाचा – अंधारे-राऊत राहिले बाजूला, भाजपाचे आंदोलन पाकिस्तानच्या भुत्तोंविरोधात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -