भाजपाच्या संसदीय समितीची घोषणा, नितीन गडकरींना वगळले

संसदीय समितीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा या समितीत समावेश आहे.

nagpur nitin gadkari

भाजपाने आपल्या संसदीय समितीतील (Parliamentary Committee) सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. या समितीत काही नवीन लोकांना संधी मिळाली आहे तर, काही जुन्या नेत्यांची नावे कमी केली आहेत. संसदीय समितीमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (MP CM Shivraj Singh Chauhan) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची नावे हटवण्यात आली आहेत. (BJP Parliamentary Committee Announcement, Nitin Gadkari’s Name Deleted)

हेही वाचा – फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी मिळेल, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य

संसदीय समितीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा या समितीत समावेश आहे. तर, बीएस येदयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बीएल संतोष (सचिव) सुद्धा या समितीत आहेत.

निवडणूक समितीचीही स्थापना

भाजपने केंद्रीय निवडणूक समितीही आज जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. तर, या समितीचेही अध्यक्ष जे.पी.नड्डाच राहणार आहेत. या समितीत भाजपचे एकूण १५ सदस्य सहभागी आहेत. जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येदयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, बीएल संतोष आणि वनथी श्रीनिवास यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा – …तर कायदा मोडण्याचे अधिकार आम्हाला, केंद्रीय मंत्री गडकरींचे वक्तव्य