घरमहाराष्ट्रनागपूरफडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी मिळेल, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी मिळेल, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य

Subscribe

चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आज त्यांचा नागपुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते आमदार, खासदार, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर स्तुतिसुमने उधळळी. 

नागपूर – “जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो? बावनकुळेंना मी मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा देत नाही बरं. नाहीतर लगेच बातम्या होतील. ‘गडकरी का फडणवीस को संदेश’ म्हणून. मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजे, फडणवीस केंद्रात गेल्यावर बावनकुळेंचा विचार होईल,” अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नागपुरात आयोजित केलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे, सत्कार समारंभात फडणवीसांची कोपरखळी

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आज त्यांचा नागपुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते आमदार, खासदार, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

चंद्रशेखर बावनकुळेंना येणाऱ्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. त्यांच्या कतृत्त्वाला वाव मिळणार आहे. ऑटो रिक्षा चालवणारा माणूस भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मुलगा आणि आईचा पक्ष नाही. फडणवीसांच्या वडिलांच्या हाताखाली मी काम केलं आहे. फडणवीसांचे वडील आजारी होते. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला राजकारणात घ्या कधीच म्हटलं नाही. फडणवीसांनी जे काही मिळवलं ते स्वत:च्या कष्टाने मिळवलं. ते स्वत:च्या मेहनतीने खूप पुढे गेले आहेत.  म्हणून मी म्हणतो कुणी माझ्या मुलाला तिकीट द्या, असं म्हणत असेल तर बिलकुल देऊ नका. पण जनतेने म्हटलं एखाद्याच्या मुलाला तिकिट द्या तर त्याला नक्की तिकिट द्या, असं नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन

चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात भाजपा मोठी झेप घेईल- फडणवीस

अनेक प्रदेशाध्यक्ष विदर्भ, नागपूरने दिले. आज जी पक्षाची झेप आहे, त्यात आतापर्यंतच्या सर्व प्रदेशाध्यक्षांचे मोठे योगदान आहे. आज त्याच मालिकेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश झाला आहे. अतिशय मेहनतीने, अभ्यासाने काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे आहेत. तळागाळातील कार्यकर्ता पक्षातील प्रदेशाध्यक्षपदासारख्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, याचा आदर्श म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात निश्चितपणे भाजपा मोठी झेप घेईल.
अडीच वर्षांचा काळ वाया गेला आहे. आता उर्वरित अडीच वर्षांत 5 वर्षांचे काम करायचे आहे. शेतकर्‍यांना दुप्पट मदत करण्याचा निर्णय आता आपण घेतला आहे. इतरही विविध प्रकारची मदत देणार, असंही फडणवीस म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -