घरताज्या घडामोडी'या' राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपा पराभवाच्या दिशेने?

‘या’ राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपा पराभवाच्या दिशेने?

Subscribe

एकिकडे सत्ता असलेल्या गुजरातमध्ये भाजपा पुन्हा विजयी होत असली तरी, दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थानसह काही राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या काही जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची दाणादाण उडाली असल्याचे कलांमधून समोर येत आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या निकालानुसार गुजरातमध्ये भाजपा आणि हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. एकिकडे सत्ता असलेल्या गुजरातमध्ये भाजपा पुन्हा विक्रमी जागा मिळवत असली तरी, दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थानसह काही राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या काही जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची दाणादाण उडाली असल्याचे कलांमधून समोर येत आहे. (By Election Result UP Bihar Odisha Rajasthan BJP loss in by elections)

1 लोकसभा आणि ६ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत भाजपा पराभवाच्या दिशेने जात असल्याचे समजते. उत्तर प्रदेशमधील एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाचे उमेदवार पिछाडीवर पडले आहेत.

- Advertisement -

काय आहेत पोट निवडणुकीचे निकाल?

मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांनी आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार रघुराज सिंह शाक्य यांच्यावर सव्वा लाखांहून अधिक मतांची आघाडी घेतल्याचे समजते. उत्तर प्रदेशच्या रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहम्मद असिम राजा यांनी भाजपाचे उमेदवार आकाश सक्सेना यांच्यावर आघाडी घेतली आहे. तसेच, खतौली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दल पक्षाचे उमेदवार मदन भैया यांनी भाजपाच्या राजकुमारी यांच्यावर आघाडी घेतली आहे.

त्याशिवाय, राजस्थान, छत्तीसगड आणि ओदिशामधील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे तर ओदिसामध्ये बिजू जनता दल पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

- Advertisement -

दरम्यान, बिहारमधील कुऱ्हानी मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि जनता दल युनायटेडच्या उमेदवारांमध्ये अटितटीची लढाई सुरू आहे. याठिकाणी जेडूयूचे उमेदवार मनोज कुमार सिंह यांनी भाजपाच्या केदार प्रसाद गुप्ता यांच्यावर १९०० मतांनी आघाडी घेतली आहे.


हेही वाचा – हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची मोर्चेबांधणी; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -