घरताज्या घडामोडीLive Update: एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी संपली, कार्यालयातून पडले बाहेर

Live Update: एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी संपली, कार्यालयातून पडले बाहेर

Subscribe

मुंबईत २४ तासात ६२८ रुग्णांची कोरोनावर मात, १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

(सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -


राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी संपली, तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर एकनाथ खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्याही ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

माजी आयपीएस अधिकारी के अण्णामलाई यांची तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अण्णामलाई यांची नियुक्ती केली आहे.


कोरोनामध्ये आपत्कालीन हेल्थ पॅकेजमध्ये २३,१२३ करोड रुपयांची तरतूद – मनसुख मांडवीय


मुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणाऱ्या SULLI DEAL एपविरोधात FIR

सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा 


मीरा रोडमधून दोन ड्रग तस्करांना एनसीबीनं केलं अटक, दोघांपैकी एकजण नायरजेरियन असून त्यांच्याकडे कोकेन ड्रग सापडले आहे. दोघांनाही न्यायालयाने ५ दिवसांची एनसीबी कोठडी दिली आहे.


राज्याच्या वाट्याला चारही चांगली खाती – देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व मंत्र्यांना चांगली खाती मिळाली. यासह मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला आनंद असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याच्या चौकशी दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली. तेव्हापासून एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणातील कारवाया सुरू आहेत. काल, बुधवारी मध्यरात्री मुंबई एनसीबीने मोठी कारवाई केली. बॉलिवूड कलाकारांनी ड्रग्ज पुरवणारा सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मिरारोड परिसरातून एनसीबीने अटक केली आहे.


मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना स्थान – पटोले

मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना स्थान. संजय धोत्रेंसारख्या काम करणाऱ्यांना घटवलं. यासह कोरोना सारखी परिस्थिती हाताळण्यात मोदींना अपयश आले, मोदींनीच राजीनामा द्यायला हवा होता, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं टीकास्त्र


नारायण राणे केंद्रीय मंत्रिपदी विराजमान


डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

Dr. Bharati Pravin Pawar takes charge as the Minister of State in the Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/juL6M2AEDb

— ANI (@ANI) July 8, 2021


केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला


रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला


कपिल पाटील, भारती पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रॉडक्ट. राणेंना मिळालेलं खातं त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही, असे म्हणत संजय राऊतांची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक प्रतिक्रिया


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल


गुरूवारी देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढून गेल्या २४ तासात ४५ हजाराहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासह ४४ हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली असून ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट हा ९७.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे.


अरुण गवळीचा २८ दिवसांच्या संचित रजेसाठी अर्ज

‘डॅडी’ या नावाने कुख्यात असलेला डॉन अरुण गवळीने २८ दिवसांच्या संचित रजेची मागणी केली आहे. कुटुंबाला भेटण्यासाठी अरुण गवळीने संचित रजा मागितली आहे. फर्लोचा अर्ज कारागृह प्रशासनाने नामंजूर केल्यानंतर गवळीने न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.


दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एकूण ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दोन लष्कराच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.


राज्यात मोसमी पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय

राज्याच्या सर्वच भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोसमी पाऊस क्षीण झाला आहे. गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचे निधन झाले आहे. शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये वीरभद्र सिंह यांनी आज अखेरचा श्वास घेतला.


पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती खराब झाल्याने आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.


राज्यातील कोरोनामुक्त भागात इयत्ता ८वी ते १२च्या शाळा १५ जुलै पासून सुरु

राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता १ली ते १२ वीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता ८वी ते १२ चे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -