घरCORONA UPDATEएक मास्क फक्त ४० टक्के सुरक्षित, 'डबल' मास्किंगचा तज्ज्ञांचा सल्ला

एक मास्क फक्त ४० टक्के सुरक्षित, ‘डबल’ मास्किंगचा तज्ज्ञांचा सल्ला

Subscribe

देशात कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी तोंडावर मास्क लावणे गरजेचे असल्याचे वेळोवेळी सांगितले जातेय. दरम्यान एका संशोधनातून कोरोना विषाणू ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरत नसून एअरबोर्न म्हणजेच हवेच्या माध्यमातून पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. यात नागरिक वापर असलेले सिंगल मास्क फक्त ४० सुरक्षित असल्याने घराबाहेर पडताना चेहऱ्यावर डबल माक्सिंगचा वापर करण्याचा तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान कोरोना विषाणू कोणत्याही माध्यामातून पसरत असला तरी नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी N95 किंवा KN95 मास्कचा वापर करा, आणि ते एक दिवसाआड आलटून पाटलून धुवूण वापरा असा सल्ला युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड येथील संसर्ग विभागाचे चीफ डॉ. फहीम युनूस यांनी दिली आहे. यावर बोलताना डॉ. युनूस सांगतात, एअरबोर्नचा अर्थ हवा प्रदुषण नाही. तर एअरबोर्नचा खरा वैज्ञानिक अर्थ विषाणू हवेत पसरत राहतो. खास करून बंद जागांमध्ये त्याचा फैलाव वेगाने होतो.

- Advertisement -

दरम्यान मास्कच्या सुरक्षेबाबत बोलताना फोर्टिस एस्कॉर्ट्स रुग्णालयाचे चेअरमेन डॉ. अशोक सेठ यांनी सांगितले की, यंदा पसरलेली कोरोनाची साथ आम्ही कधी पाहिली नसून या साथीने आरोग्य व्यवस्था पूर्ती कोलमडून गेली आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी चेहऱ्यावर ‘डबल मास्किंग’ करणे गरजेचे आहे. आपण वापरत असणारे साधे सर्जिकल किंवा कापडी मास्क विषाणूपासून फक्त ४० टक्केच सुरक्षित आहेत. त्यामुळे प्रथम सर्जिकल मास्क घाला त्यावर कपड्याचा मास्क परिधान करा. याप्रकारे तुम्ही डबल मास्किंग करत विषाणूच्या ट्रांसमिशनला ९५ टक्के रोखू शकता. परंतु दररोज वापरलेले मास्क धुणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमुद केले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -