घरदेश-विदेशट्विटर वादावरुन एलॉन मस्क यांच्यावर खटला; ऑक्टोबरपासून सुनावणी

ट्विटर वादावरुन एलॉन मस्क यांच्यावर खटला; ऑक्टोबरपासून सुनावणी

Subscribe

ट्विटर विरुद्ध एलॉन मस्क अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. टेस्लाचे मालक यांनी ट्विटर डील रद्द केलं होतं. या प्रकरणात ऑक्टोबर पासून सुनावणी होणार आहे.

सुप्रसिद्ध टेस्ला या संपनीचे मालक एलॉन मस्क(Elon Musk) यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर ट्विटरने हा वाद कोर्टात नेला. ट्विटरने(Twitter) इलॉन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून एलॉन मस्कना प्रति ट्विटर शेअर $54.20 या दराने विलीनीकरण पूर्ण कारण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी ट्विटरने चान्सरी न्यायालयाला केली आहे. दरम्यान या प्रकरणातील खटल्यावर ऑक्टोबर पासून सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा – ओबीसी राजकीय आरक्षण कसं मिळवलं? फडणवीसांनी दिला तपशील

- Advertisement -

ट्विटर विरुद्ध एलॉन मस्क अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. टेस्लाचे मालक यांनी ट्विटर डील रद्द केलं होतं. या प्रकरणात ऑक्टोबर पासून सुनावणी होणार आहे. एलॉन मस्क(elon musk) आणि ट्विटर यांच्यातील ४४ अब्ज कोटींचा करार सुरुवातीपासूनच खूप जास्त चर्चेत होता. पण अखेर एलॉन मस्क यांनी यांनी डील रद्द केले आणि याच संदर्भात ट्विटरने कोर्टात धाव घेतली आहे.

हे ही वाचा –  इलॉन मस्कवर ट्विटरकडून कायदेशीर कारवाई, तर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया

- Advertisement -

ट्विटरने डेलावेअर येथे एलॉन मस्क(elon musk) यांच्या विरोधात खटला दाखल केला या प्रकरणात न्यायाधीशांनी मस्क यांना मोठा झटका दिला आहे. दरम्यान या खटल्यावरील सुनावणी ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे. पण एलॉन मस्क यांनी या खटल्यासाठी फेब्रुवारी पर्यंतची मुदत मागितली होती. पण ट्विटरच्या मागणी नुसार न्यायालयाने हा खटला ऑक्टोबर मध्ये सुरु करण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान या अखटल्यामुळे ट्विटरचे फार मोठे नुकसान होणार आहे. असे डेलावेअर मधील कोर्ट ऑफ चान्सरीच्या चान्सलर कॅथलिन मॅककॉर्मिक यांनी सांगितले. ही सुनावणी पाच दिवसांची असेल.

हे ही वाचा – जगभरातील ‘या’ दहा देशांमध्ये भारतीय वंशाचे नेते आहेत उच्च पदावर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -