घरदेश-विदेशकृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं उद्यापासून 'शेतकरी संसद'; जंतर-मंतरवर आंदोलन

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं उद्यापासून ‘शेतकरी संसद’; जंतर-मंतरवर आंदोलन

Subscribe

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना जंतर-मंतरवर ‘शेतकरी संसद’ आयोजित करणार असल्याचे शेतकरी संघटनने मंगळवारी सांगितले. २२ जुलैपासून म्हणजेच उद्यापासून रोज सिंघू सीमेवरुन २०० आंदोलक शेतकरी जंतर-मंतरवर हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत एका शेतकरी नेत्याने असे म्हटलं की, “शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणार आहेत. यापैकी कोणताही शेतकरी संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात अडथळे निर्माण करणार नाही.”

रोज २०० शेतकरी सिंघू सीमेवरून जंतर-मंतर येथे दाखल

येत्या २२ जुलैपासून ते पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत ‘शेतकरी संसद’ आयोजित करणार असल्याचे शेतकरी नेत्याने सांगितले. यासह २०० आंदोलक रोज जंतर-मंतरवर दाखल होणार असून प्रत्येक दिवशी एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील. पहिल्या दोन दिवसांत, एपीएमसी अधिनियमवर चर्चा होणार आहे. त्यानंतर इतर विधेयकांवरही दररोज चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शेतकरी मजूर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार कक्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २२ जुलैपासून रोज २०० शेतकरी सिंघू सीमेवरून जंतर-मंतर येथे दाखल होऊन ओळखपत्रासह आंदोलन करण्यासाठी हजर होणार आहेत. तसेच केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे ४० पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचे संयुक्त किसान मोर्चाने तयार केलेल्या योजनेनुसार, २२ जुलैपासून दररोज साधारण २०० शेतकरी पावसाळी अधिवेशनात संसदेबाहेर आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

आंदोलन शांततेत पार पडणार

राष्ट्रीय शेतकरी मजूर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार कक्का म्हणाले, “आम्ही पोलिसांना आंदोलनासंदर्भात माहिती दिली असून दररोज २०० शेतकरी ओळखपत्रासह सिंघू सिमेवरुन जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी दाखल होणार आहेत. पुढे ते असेही म्हणाले, “पोलिसांनी आम्हाला आंदोलकांची संख्या कमी करण्यास सांगितले तेव्हा आम्ही त्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आणि आंदोलन शांततेत पार पडणार, असे आश्वासनही दिले,” ते म्हणाले.


ठाण्यातील पंधरा बार महापालिकेने केले सील
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -