घरदेश-विदेशस्विस बँकेत भारतीयांची किती रक्कम आहे? केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या...

स्विस बँकेत भारतीयांची किती रक्कम आहे? केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या…

Subscribe

नवी दिल्ली : विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन २०१४च्या निवडणुकीत भाजपाने दिले होते. पण स्विस बँकेतील भारतीयांच्या खात्यांमध्ये नेमकी किती रक्कम आहे, हे माहीत नसल्याचे दशकभरापूर्वी केंद्र सरकारने सांगितले होते. तेच उत्तर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिले. तथापि, स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशांमध्ये ८.३ टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

स्विस बँकेतील भारतीयांच्या खात्यांमधील रकमेत २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये वा़ढ झाली आहे का, असा प्रश्न निर्मला सीतारामन यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, स्विस बँकेत भारतीय नागरिक किंवा कंपन्यांनी किती रक्कम जमा केली आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, विदेशात दडवण्यात आलेली रक्कम शोधण्याचे तसेच त्यावर करआकारणी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

सन २०२१मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांच्या खात्यांमधील रकमेत वाढ झाल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले होते. परंतु स्विस अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. लोकेशनल बँकिंग स्टॅटिस्टिक्सच्या आधारे याचा अंदाज घेण्यास या अधिकाऱ्याने सांगितले. त्याच अनुषंगाने, २०२१मध्ये स्विस बँकेतील भारतीयांच्या रकमेत ८.३ टक्क्यांची घट झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

एचएसबीसीत कोट्यवधींची अघोषित रक्कम
विदेशातील काळा पैसा आणण्याासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. एचएसबीसी प्रकरणात ३१ मे २०२२पर्यंत ८४६८ कोटी रुपयांची अघोषित रक्कम असल्याचे उघड झाले असून त्यावर १२९४ कोटी रुपयांचा कर लावण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

काळ्या पैशांवरील करवसुली
विदेशातील अघोषित रक्कम भारतात आणण्यासंदर्भात काळा पैसा कायदा, २०१५च्या अंतर्गत एकूण ६४८ प्रकरणांत ४१६४ कोटी रुपयांची अघोषित रक्कम उघडकीस आली आहे. त्यातील ३६८ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून त्यावर दंड आणि व्याजासहित १४,८२० कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत २४७६ कोटी रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यात आला आहे, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

हेही वाचा – धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हालाच मिळेल, आमच्याकडे जास्त संख्या; संजय शिरसाटांचा दावा

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -