घरराजकारणहिमाचल प्रदेश निवडणूकहिमाचलमध्ये 11 पैकी 9 विद्यमान मंत्र्यांचा पराभव, मुख्यमंत्री अन् ऊर्जामंत्र्यांनी आब राखली

हिमाचलमध्ये 11 पैकी 9 विद्यमान मंत्र्यांचा पराभव, मुख्यमंत्री अन् ऊर्जामंत्र्यांनी आब राखली

Subscribe

आतापर्यंत जे ट्रेंड आणि निकाल समोर आले आहेत, त्यात जयराम यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची अवस्था फार वाईट झालीय. एकूण 9 मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे

हिमाचल प्रदेशातील निकालामुळे राज्याचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा यंदाही सुरूच राहिलीय. भाजपला 25 तर काँग्रेसला 40 जागा मिळाल्यात. इतरांना 3 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. यावेळी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असतानाच त्यांनी विजय संपादन केला आहे.

आतापर्यंत जे ट्रेंड आणि निकाल समोर आले आहेत, त्यात जयराम यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची अवस्था फार वाईट झालीय. एकूण 9 मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे सेराज मतदारसंघातून विजयी झाले आहेत. लाहौल स्पितीमध्ये काँग्रेसच्या रवी ठाकूर यांनी तंत्रशिक्षण मंत्री रामलाल मार्कंडा यांचा पराभव केलाय. तर मंत्री सुरेश भारद्वाज यांचाही पराभव झालाय. जयराम मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय सांभाळणाऱ्या सरवीन यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. उद्योगमंत्री बिक्रम सिंह हे आधी आघाडीवर होते, पण आता तेही त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत.

- Advertisement -

यावेळी विधानसभा निवडणुकीत राज्यातील 68 जागांसाठी एकूण 412 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांमध्ये जयराम मंत्रिमंडळातील 11 मंत्र्यांनी निवडणूक लढवली होती. जाणून घेऊया मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांच्या जागांची अवस्था काय आहे.

कॅबिनेट मंत्री रामलाल मार्कंडांचा पराभव
हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती विधानसभा जागेवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे तगडे नेते आणि कॅबिनेट मंत्री रामलाल मार्कंडा येथून निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार रवी ठाकूर यांचा विजय झालाय. रामलाल मार्कंडा यांच्याकडे तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे.

- Advertisement -

जयराम ठाकूर यांचा मोठा विजय
सेराज मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काँग्रेसच्या चेतराम यांच्यासमोर मोठा विजय नोंदवला. त्यांनी चेतराम यांचा ३८,१८३ मतांनी पराभव केला.

शिक्षण मंत्री गोविंदसिंगांचा पराभव
जयराम मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री गोविंद सिंह यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. ते मनाली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी मंत्री राजकृष्ण गौड यांचे पुत्र भुवनेश्वर गौड यांचे आव्हान होते. या निवडणुकीत भाजपच्या गोविंद सिंह यांचा काँग्रेसच्या भुवनेश्वर गौर यांनी 2957 मतांनी पराभव केला.

सुरेश भारद्वाज निवडणूक हरले
कसुंप्ती मतदारसंघातून भाजपचे सुरेश भारद्वाज निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भारद्वाज यांच्याकडे सध्या शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी होती. या निवडणुकीत भारद्वाज यांचा ८६५५ मतांनी पराभव झाला. त्यांना काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध सिंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागलाय.

ऊर्जामंत्र्यांचा विजय
सुखराम चौधरी हे हिमाचल प्रदेश सरकारमध्ये एमपीपी आणि ऊर्जामंत्री आहेत. चौधरी या निवडणुकीत पांवटा साहिब विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे किरणेश जंग यांचा ८५९६ मतांनी पराभव केला.

मंत्री सरवीन यांचा पराभव
सरवीन चौधरी या जयराम मंत्रिमंडळात मंत्री होते. यावेळी त्या शाहपूर मतदारसंघातून रिंगणात होत्या. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरवीन यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यांचा काँग्रेसच्या केवल सिंह यांनी 12243 मतांनी पराभव केला.

आरोग्यमंत्र्यांनाही आपली खुर्ची गमावली
या निवडणुकीत हिमाचल सरकारचे आरोग्य मंत्री राजीव सैजल यांचा पराभव झाला आहे. सैजल कसौली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांचा काँग्रेसच्या विनोद सुलतानपुरी यांनी 6768 मतांनी पराभव केला.

वनमंत्री राकेश पठानियांचाही पराभव
या निवडणुकीत हिमाचल प्रदेश सरकारचे वनमंत्री राकेश पठानिया यांचा पराभव झाला आहे. ते फतेहपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते. त्यांचा काँग्रेसच्या भवानी सिंग पठानिया यांनी ७३५४ मतांनी पराभव केला आहे.

मंत्री राजेंद्र गर्ग यांचा पराभव
या निवडणुकीत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री राजिंदर गर्ग यांचा घुमरविन मतदारसंघातून पराभव झालाय. त्यांचा काँग्रेसच्या राजेश धर्मानी यांनी 5611 मतांनी पराभव केला.

पंचायत राज मंत्री पराभूत झाले
जयराम मंत्रिमंडळातील ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री वीरेंद्र कंवर यांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत कुटलेहार मतदारसंघातून कंवर रिंगणात होते. वीरेंद्र कंवर यांचा काँग्रेसच्या दविंदर कुमार यांनी ७५७९ मतांनी पराभव केला.


हेही वाचाः मोरबी पूल दुर्घटनेत नागरिकांचे जीव वाचविणारा भाजपचा उमेदवार विजयी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -