घरदेश-विदेशHelicopters Crash : अमेरिकेत प्रशिक्षणादरम्यान लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर, अनेकांचा मृत्यू झाल्याची...

Helicopters Crash : अमेरिकेत प्रशिक्षणादरम्यान लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Subscribe

नवी दिल्ली : अमेरिकेत लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान ब्लॅक हॉक या दोन अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरचा बुधवारी (२९ मार्च) अपघात झाला आहे. स्थानिक माध्यमांनी नऊ जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार हे दोन्ही हेलिकॉप्टर केंटकीमध्ये उड्डाण करत होते, त्यादरम्यान त्यांचा अपघात झाला. स्थानिक अधिकारी आणि आपत्कालीन सेवा बचाव कार्यात व्यस्त आहेत.

व्हिएतनाम युद्धानंतर ब्लॅक हॉक हे अमेरिकेने विकसित केलेले फ्रंट लाइन युटिलिटी हेलिकॉप्टर आहे. अमेरिकेच्या मित्र देशांचे विशेष दल जगभरात अशा हेलिकॉप्टरचा वापर करतात. हे हेलिकॉप्टर विशेष मोहिमा पार पाडण्यासाठी प्रभावी असल्याचे सांगितले जाते. कारण यांचा वेग जास्त असून यामध्ये अधिक तांत्रिक गोष्टी आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आंध्र प्रदेशात राम नवमीला भीषण दुर्घटना; वेणुगोपालस्वामी मंदिरातील मंडपाला आग

केंटकीच्या राज्यपालांनी सांगितले की, राज्यातील नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान बुधवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. आम्हाला फोर्ट कॅम्पबेलमधून विचलित करणाऱ्या गोष्टी समजत आहेत, असे राज्यपाल अँडी बेशियर यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

अपघातानंतर एका स्थानिक रहिवाशाने डब्ल्यूकेडीझेड रेडिओला सांगितले की, दोन्ही हेलिकॉप्टर खूप खाली आले आणि अचानक मोठा आवाज झाला. स्फोटानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो असता आम्हाला दोन्ही हेलिकॉप्टर जळताना दिसले. ट्रिग काउंटी जेलर जेम्स ह्यूजेसने रेडिओ स्टेशनला सांगितले की, घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत या अपघाताचा आवाज ऐकू आल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा – पप्पू म्हणत ललित मोदीचे ट्वीट; राहुल गांधींविरोधात ब्रिटनमध्ये करणार तक्रार

दरम्यान, फोर्ट कॅम्पबेलचे प्रवक्ते नॉंडिस थर्मन यांनी सांगितले की, बुधवारी रात्री १० वाजता (स्थानिक वेळेनुसार) हा अपघात केंटकीच्या महामार्ग ६८ जवळील ट्रिग काउंटीमध्ये झाला. हे दोन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर 101 व्या एअरबोर्न डिव्हिजनद्वारे चालवले जात होते. क्रू मेंबर्स नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हे हेलिकॉप्टर उडवत असताना ही घटना घडली. स्थानिक माध्यमांनी नऊ जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -