घरताज्या घडामोडीबिहार हिंसाचार : सुरक्षेच्या कारणात्सव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा सासाराममधील कार्यक्रम रद्द

बिहार हिंसाचार : सुरक्षेच्या कारणात्सव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा सासाराममधील कार्यक्रम रद्द

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सासाराममध्ये होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सम्राट अशोक यांच्या स्मरणार्थ एका मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, बिहारमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सुरक्षेच्या कारणात्सव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सासाराममध्ये होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सम्राट अशोक यांच्या स्मरणार्थ एका मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, बिहारमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सुरक्षेच्या कारणात्सव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याबाबत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी माहिती दिली. (Home Minister Amit Shah Program In Sasaram Rohtas Cancelled Due To Bihar Violence Bjp Informed Samrat Chaudhary)

कलम 144 लागू

- Advertisement -

‘आम्ही सासाराममध्ये सम्राट अशोक यांच्या स्मरणार्थ एक मोठा कार्यक्रम घेणार होतो, पण बिहार सरकार सुरक्षा देऊ शकले नाही’, असे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहांच्या सासाराम दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, कलम 144 लागू झाल्यामुळं आणि घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं शहा यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

10 मिनिटं दगडफेक

- Advertisement -

दरम्यान, कादिरगंज, मुबारकगंज, चौखंडी नवरत्न बाजार येथील दुकानांसोबतच घरांचे दरवाजेही बंद आहेत. असे असतानाही आज 10 मिनिटं दगडफेक झाली. यामध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेने तणाव कायम असल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी

सध्या डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस माईकद्वारे कलम 144 लागू करण्याबाबत माहिती देत आहेत. इंटरनेट सेवा बंद ठेवून अफवा रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा – ‘संशयित आरोपीने पाहिला होता लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ, दारुच्या नशेत दिली संजय राऊतांना धमकी’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -