घरताज्या घडामोडीCoronavirus: कोरोना उपचारपद्धतीतून प्लाझ्मा थेरेपीला हटवले, ICMRची नवी गाईडलाईन जारी

Coronavirus: कोरोना उपचारपद्धतीतून प्लाझ्मा थेरेपीला हटवले, ICMRची नवी गाईडलाईन जारी

Subscribe

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी नाही - आयसीएमआर

कोरोना संकट दरम्यान प्लाझ्मा थेरेपीबाबत आयसीएमआरने आणि एम्सने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना उपचारपद्धतीमधून प्लाझ्मा थेरेपीला हटवण्यात आले आहे. आता देशात कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा उपचार केला जाणार नाही आहे. कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी नसल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आयसीएमआरच्या उपचारपद्धतीच्या नियमावलीतून प्लाझ्मा थेरेपी हटवण्याचा निर्णय झाला आहे.

प्लाझ्मा थेरेपीचा वापर कोरोनाच्या अंतिगंभीर रुग्णांसाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी गेला जात होता. मात्र ही थेरेपी असरदार नसल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी आयसीएमआरची नॅशनल टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत बैठक पार पडली आणि कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नवी गाईडलाईन जारी करण्यात आली. यावेळेस बैठकीत प्लाझ्मा थेरपी बंद करण्याविषयी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर आयसीएमआरच्या उपचारपद्धतीच्या नियमावलीतून प्लाझ्मा थेरेपी हटवण्याचा निर्णय झाला.

- Advertisement -

 

- Advertisement -

या नव्या गाईडलाईमध्ये कोरोना रुग्णांना तीन भागात वाटले आहे. पहिला – सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, दुसरा – मध्यम लक्षणे असलेले रुग्ण आणि तिसरा – गंभीर लक्षणे असलेले रुग्ण, अशाप्रकारे रुग्णांना तीन भागामध्ये वाटण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी आयसोलेशनमध्ये राहणे, मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोविड वॉर्डमध्ये राहणे आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनी आयसीयूमध्ये दाखल होणे, असे सांगितले आहे.

गेल्या वर्षापासून रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी दिली जात होती. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान प्लाझ्माची मागणी जास्त वाढली होती. परंतु तज्ज्ञांनी ही थेरेपी असरदार नसून फक्त सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फायदेशीर ठरते असे सांगितले होते. शुक्रवारी झालेल्या आयसीएमआर आणि नॅशनल टास्क फोर्सच्या बैठकीत सर्व सदस्य कोरोना रुग्णांच्या उपचारपद्धतीतून प्लाझ्मा थेरेपी हटवली पाहिजे, यावर सहमत झाले.


हेही वाचा – कोविन पोर्टलमध्ये पुढील आठवड्यापासून हिंदीसह १८ भाषांचा समावेश, कोविड परीक्षण लॅब जोडणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -