घरताज्या घडामोडीपाकमध्ये इम्रान खान यांची पैगंबरांशी तुलना, जमावाकडून मुस्लीम विचारवंताची हत्या

पाकमध्ये इम्रान खान यांची पैगंबरांशी तुलना, जमावाकडून मुस्लीम विचारवंताची हत्या

Subscribe

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये एका जमावाकडून मुस्लिम विचारवंतांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल(शनिवार) घडली. एका रॅलीदरम्यान मृत व्यक्तीवर ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त झालेल्या जमावाने ईशनिंदा केल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तिची हत्या केली. या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो लोकांचा जमाव एका व्यक्तीला काठीच्या साहाय्याने मारहाण करताना दिसत आहे. ही मृत व्यक्ती इम्रान खान यांचा समर्थक असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या व्यक्तीचे वय ४० वर्ष आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत लेखक हॅरिस सुलतान यांनी ट्विट केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये इस्लामबद्दल काहीही बोलणे धोक्यापासून मुक्त नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. संतप्त जमावाने इम्रान खानच्या समर्थकाच्या हत्येबाबत त्यांनी दावा केला आहे की, जमावाने ज्या व्यक्तीला मारले होते तो मुस्लिम विचारवंत होता.

- Advertisement -

लेखकाच्या दाव्यानुसार, ही विचारवंत व्यक्ती इम्रान खान यांच्यावर पैगंबरांइतकीच प्रेम करते. अशी कबुली त्या मृत व्यक्तीने जाहीरपणे दिली होती. एवढाच गुन्हा या मृत व्यक्तीचा होता. इम्रान खान यांच्यावर प्रेम करण्यामागे त्यांनी तर्क केला की, पीटीई प्रमुख अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत.

हॅरिस सुलतान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मी जवळपास 5 वर्षांपासून म्हणतोय की, लिंचिंगच्या अशा घटना वाढणार आहेत. हॅरिस सुलतानने आपल्या ट्वीटमध्ये व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये संतप्त जमाव एका मुस्लिम विचारवंतांना मारहाण करताना दिसत आहे.


हेही वाचा : सुदानमधील ‘ऑपरेशन कावेरी’ हे आव्हानात्मक होतं, एस. जयशंकर यांनी दिली माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -