घरदेश-विदेशपाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; जवानांचंही चोखप्रत्युत्तर

पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; जवानांचंही चोखप्रत्युत्तर

Subscribe

भारतीय वायुसेनेने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत त्यांना चोखप्रत्युत्तर दिले आहे. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवाना जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे भारतीय वायुसेनेने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत त्यांना चोखप्रत्युत्तर दिले आहे. आज भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दलानंपाकिस्तानच्या हद्दीत घुसून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्ताननं आतापर्यंत अखनूर, नौशेरा आणि पुंछ सेक्टरमध्ये जोरदार गोळीबाराला सुरुवात केली आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे.

सतर्कतेचा इशारा

भारतानं नियंत्रण रेषेजवळच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सध्या पाकिस्तानचा अखनूर, नौशेरा आणि पुंछ सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरु आहे.

- Advertisement -

असा घेतला बदला

१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेतला आहे. १२ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायूसनेने केलेल्या हल्ल्यात बालाकोट, चकोटी, मुजफ्फराबादमधील जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त झाले आहेत. बालाकोट पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाहमध्ये येतो. हवाई हल्ला करण्यात आलेली जागा एलओसीपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यात जैशचा कंट्रोल रुम उध्वस्त करण्अयात आल्सूया असून ३५० दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुलवामा दहशवादी हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या भारताने पाकिस्तानचा बदला घेतल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला आहे. मिराज २००० या लढाऊ विमानानं जैश-ए-मोहम्मदच्या १२ तळावर हल्ला केला. बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ आहे. हल्ल्यानंतर बालाकोटामध्ये स्फोटांचे मोठे आवाज झाले. जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलो बॉम्ब हल्ला भारताच्या हवाई दलाने केला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला असून या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, या हवाई हल्ल्याची अजित डोवल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदिंना माहिती दिली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.


हेही वाचा – राफेलची किती आवश्यकता आहे हे जाणवतंय – माजी हवाई दल प्रमुख

- Advertisement -

हेही वाचा – योग्य वेळ आल्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ – पाकिस्तान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -