घरदेश-विदेशनवा अशोक स्तंभ आक्रमक आणि रागीट, राष्ट्रीय चिन्हाचा अपमान झालाय; तृणमूलच्या खासदाराची...

नवा अशोक स्तंभ आक्रमक आणि रागीट, राष्ट्रीय चिन्हाचा अपमान झालाय; तृणमूलच्या खासदाराची मोदींवर टीका

Subscribe

नव्याने अनावरण झालेला अशोक स्तंभाची प्रतिमा आक्रमक आणि विसंगत असल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि महुआ मोईत्रा यांनी केली आहे. तसेच, हे स्तंभ तातडीने बदलावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे अनावरण झाले. मात्र, यावरून आता वाद सुरू झाला आहे. नव्याने अनावरण झालेला अशोक स्तंभाची प्रतिमा आक्रमक आणि विसंगत असल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि महुआ मोईत्रा यांनी केली आहे. तसेच, हे स्तंभ तातडीने बदलावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. (Insult to our national symbol, the majestic Ashokan Lions, says Trunmul MP)

आपलं राष्ट्रीय चिन्ह, अशोक स्तंभाचा अपमान झाला आहे. डाव्या बाजूला दिलेला मूळ अशोक स्तंभ हा शांत, सयंमी आणि आत्मविश्वासी आहे. मात्र, उजव्या बाजूला असलेल्या मोदींच्या दृष्टीतील संसदेच्या नव्या इमारतीतील अशोक स्तंभ हा आक्रमक, रागीट आहे. त्यामुळे तत्काळ हा स्तंभ बदलावा, असं जवाहर सरकार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -


तर, खासदार महुआ मोइत्रा यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. महुआ मोइत्रा यांनी जुना अशोक स्तंभ आणि नवा अशोक स्तंभाचे फोटो ट्विट करत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं.


दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी काल संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले. ६.५ मीटर उंचीचा हा स्तंभ असून कांस्यपासून बनवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे औरंगाबादच्या शिल्पकाराने हे शिल्प साकारले आहे. औरंगाबादचे रहिवासी आणि जे.जे स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी सुनील देवरे आणि सुशील देवरे या बंधूंनी हे शिल्प साकारले आहे.

- Advertisement -

स्तंभाचे वैशिष्ट्य काय?

उंची – २६ फूट

व्यास – ११ फूट

वजन – ९ टन

स्ट्र्क्चरल डिझाईन – धनश्री काळे, वास्तुविशारद, औरंगाबाद

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -