Eco friendly bappa Competition
घर राजकारण समृद्धी महामार्गाची पाहाणी अन् काँग्रेस - भाजपात रंगले 'कार वॉर'

समृद्धी महामार्गाची पाहाणी अन् काँग्रेस – भाजपात रंगले ‘कार वॉर’

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहाणी केली. या वेळी शिंदे व फडणवीस यांनी एकाच वाहनातून शिर्डीपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्या वाहनाचेही सारथ्य केले. मात्र फडणवीस यांनी चालवलेली गाडी बिल्डरची होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर, भाजपाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत, काँग्रेसवर पलटवार केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 530 किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गाची पाहणी करण्याचे शिंदे-फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार रविवारी दुपारी पाऊणच्या सुमारास त्यांनी समृद्धी महामार्गावरील प्रारंभ स्थानाहून (झीरो पॉइंट) शिर्डीकडे प्रवासाला सुरुवात केली. शिंदे आणि फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करीत होते. या वेळी फडणवीस हे स्वत: वाहन चालवत होते, तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. फडणवीस यांनी ताशी 150 किमी वेगाने गाडी चालवली.

- Advertisement -

काँग्रेसने यावरून भाजपावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बिल्डरची गाडी चालवली, मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?, असा सवाल काँग्रेसने एका ट्वीटद्वारे केला आहे. ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रकर या नावाने असल्याचे या ट्वीटमध्ये दिसते. त्यावर भाजपाने ट्विटरवरूनच पलटवार केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा कारमधील एक फोटो शेअर करत, 65 वर्षांत काँग्रेसला जमले नाही, ते भाजपाने 7 वर्षांत पूर्ण केले. समृद्धी महामार्गावरील ट्रायल काँग्रेसला बघवली नाही. बिल्डरची गाडी वापरली म्हणत खोड काढण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी जनतेला गंडवलेल्या सहारा ग्रुपची गाडी अनकेदा वापरली आहे, अशी टीका भाजपाने एका ट्वीटद्वारे केली आहे.

- Advertisment -